AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकमध्ये पुन्हा पाऊस मुक्कामी; हवामान विभागाचा अंदाज

नाशिकमध्ये आजपासून सलग पाच दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

नाशिकमध्ये पुन्हा पाऊस मुक्कामी; हवामान विभागाचा अंदाज
संग्रहित छायाचित्र.
| Edited By: | Updated on: Oct 16, 2021 | 3:38 PM
Share

नाशिकः नाशिकमध्ये आजपासून सलग पाच दिवस म्हणजेच 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. त्यात 16 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. 17 ऑक्टोबर रोजी नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. खरे तर 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मंगळवार आणि बुधवारी रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे.

धरणे तुडूंब

मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर चार वेळेस पूर आला.नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

मराठवाड्यात कोकणपेक्षा जास्त पाऊस

विशेष म्हणजे यंदा मराठवाड्याने सरासरीच्या बाबतीत कोकणालाही मागे टाकले. राज्यात यंदा जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला. राज्यात चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. नंदुरबार, सांगली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आयएमडीच्या अहवालानुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुढीलप्रमाणे पाऊस पडला.

इतर बातम्याः

फडणवीस ‘क्लीन मास्टर’, भुजबळांची सडकून टीका; ठाकरे-पवारांसारखेच मुख्यमंत्री लक्षात राहतात…!

डेंग्यू, चिकुन गुन्याचे नाशिकमध्ये थैमान; रुग्णांनी गाठला पाच वर्षांतील उच्चांक

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.