‘…म्हणूनच शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू’, चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिक यांना टोला

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्यावर सडकून टीका केलीय. लवकरच सरकार पडेल असं वाटत असल्याने नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू केली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून नवाब मलिक यांना शाहरुख खानचा मुलगा वगळता दुसरे कुठलेच विषय दिसत नाहीयेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

'...म्हणूनच शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू', चंद्रकांत पाटलांचा नवाब मलिक यांना टोला
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप


परभणी : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी बॉलिवुडकडून वसुली केल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. या आरोपानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मलिक यांच्यावर सडकून टीका केलीय. लवकरच सरकार पडेल असं वाटत असल्याने नवाब मलिक यांनी शाहरुख खानच्या मुलाची वकिली सुरू केली आहे. मागच्या पंधरा दिवसांपासून नवाब मलिक यांना शाहरुख खानचा मुलगा वगळता दुसरे कुठलेच विषय दिसत नाहीयेत, अशी खोचक टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोके तपासून घेण्याची वेळ आली

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नव्हतं म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्लॅन केला, असा आरोप मंत्री वडेट्टीवार यांनी केला. यावरदेखील चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. “महाविकास आघाडीच्या नेत्यांची डोके तपासून घेण्याची वेळ आली आहे. ज्याला जे सुचेल ते तो बोलतोय. खोटं बोल पण रेटून बोल अशी अवस्था महाविकास आघाडीच्या नेत्यांची झाली आहे. गडकरी आमचे नेते आमचे पालक आहेत. ते आमची सगळ्यांची काळजी घेतात. वडेट्टीवार यांनी कोठून शोध लावला हे माहिती नाही,” अशी टोलेबाजी चंद्रकांत पाटील यांनी केली.

नवाब मलिक यांनी काय आरोप केले ?

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे तसेच त्यांच्या कुटुंबीयांवर खंडणीसारखे गंभीर आरोप केले आहेत. कोरोनाकाळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते. मीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का? असा सवाल मलिक यांनी केला होता.

निवृत्त झालेल्या वडिलांवर आरोप केले जात आहेत

वानखेडे यांनी नवाब मलिक यांना सडेतोड उत्तरे दिले. “मागील पंधरा दिवसांपासून माझ्या परिवारावर आरोप केले जात आहेत. मी एक छोटा सरकारी नोकर आहे. देशसेवा करण्यासाठी जर तुरुंगात टाकले जात असले तर माझी हरकत नाही. एक छोटे मुल असलेल्या आईची जासुसी केली जात आहे. माझ्या मृत आईवर टीका करण्यात येत आहेत. तसेच 77 वर्षाचे असलेले तसेच निवृत्त झालेल्या माझ्या वडिलांवरदेखील टीका केली जात आहेत. या सर्व प्रकाराची मी कठोर शब्दात निंदा करतो. मुंबईतील फोटो ट्विट करुन दुबईत असल्याचे सांगितले जात आहे,” असे समीर वानखेडे म्हणाले.

इतर बातम्या :

सावधान, रशियात कोरोनाची पुन्हा लाट, दिवसभरात 1 हजार मृत्यू, नॉन वर्किंग विकची घोषणा

मलिकांनी वानखेडेंचे दुबईला गेल्याचे फोटो ट्विट केले, आता समीर वानखेडे म्हणाले, साफ खोटारडेपणा !

TET Exam 2021 | टीईटीची तारीख पुन्हा बदलली; आता ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI