पूजा चव्हाणप्रकरणी अटक केलेल्या दोघांना दोन तासांत का सोडलं?, ही मोगलाई आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलीस तपासावरून गंभीर आरोप केले आहेत. (chandrakant patil raise question on police investigation of Pooja Chavan Suicide Case)

पूजा चव्हाणप्रकरणी अटक केलेल्या दोघांना दोन तासांत का सोडलं?, ही मोगलाई आहे का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल
चंद्रकांत पाटील
Follow us
| Updated on: Feb 14, 2021 | 5:09 PM

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पोलीस तपासावरून गंभीर आरोप केले आहेत. पूजाच्या आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांना पोलिसांनी दोन तासात कसं सोडलं? ही काय मोगलाई आहे का? असा सवाल करतानाच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. (chandrakant patil raise question on police investigation of Pooja Chavan Suicide Case)

चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन हा गंभीर आरोप केला आहे. पोलिसांनी पूजा चव्हाण प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतलं. त्यांची चौकशी करून त्यांना दोन तासात सोडून देण्यात आलं. ऑडिओ क्लिपमध्ये त्या मुलाचा आवाज असल्याचं क्लिअर दिसून येतं. तरीही त्या मुलांना सोडून देण्यात आलं. ही काय मोगलाई आहे का? असा सवाल पाटील यांनी केला.

लॅपटॉप, मोबाईल कुठे आहे?

पूजा चव्हाण प्रकरणी पाटील यांनी अनेक सवाल उपस्थित केले. मोबाईलमधील संवाद कुणाचे आहेत. ज्यांचं नाव या प्रकरणात येत आहे ते सध्या कुठे आहेत? पूजाचा मोबाईल आणि लॅपटॉप कुठे आहे? शवविच्छेदन अहवाल दोन कसे आले? आदी प्रश्नांचा भडिमार त्यांनी केला.

पूजाची बदनामी केली जात आहे

समाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे प्रकरणात रेणू शर्मावर जसे आरोप करण्यात आले तशाच प्रकारे आता पूजाची बदनामी करण्यात येत आहे. पूजा दारू पित होती, तिचे इतरांशी संबंध होते, अशी तिची बदनामी सुरू झाली असून हे अत्यंत चुकीचं आहे, असंही ते म्हणाले.

तेव्हा मंत्र्याचा राजीनामा मागेल

या प्रकरणात तुम्ही वनमंत्री संजय राठोड यांचं थेट नाव का घेत नाही? मुंडे प्रकरणातही तुम्ही त्यांचं नाव घेतलं नव्हतं, असं पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावेळी मुंडे प्रकरणात मी धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. मुंडेंनी त्या प्रकरणाची कबुली दिली होती. त्यामुळे त्यांचं नाव घेतलं. मी कुणाला घाबरत नाही. मी गिरणी कामगाराचा मुलगा आहे. काय होणार आहे, असं सांगतानाच पूजाच्या प्रकरणात ऑडिओ क्लिपचा तपास सुरू आहे. या प्रकरणात पोलिसांनी संबंधित व्यक्तीचं नाव रेकॉर्डवर घेतल नाही. मग मी तरी त्यांचं नाव का घेऊ? असा सवालही त्यांनी केला. ज्या क्षणी संबंधित मंत्र्याचं नाव रेकॉर्डवर येईल, त्याच क्षणी त्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले. (chandrakant patil raise question on police investigation of Pooja Chavan Suicide Case)

संबंधित बातम्या:

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

मोर्चा निघाला पण माणसं कुठाय?; संजय राठोडांच्या होमपीचवरच मोर्चा रद्द करण्याची नामुष्की

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(chandrakant patil raise question on police investigation of Pooja Chavan Suicide Case)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.