‘घरांच्या प्रश्नांबाबत’ असंख्य महिला मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतात तेव्हा…

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे 28 जानेवारीपासून विदर्भ आणि खान्देश राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर होते.

'घरांच्या प्रश्नांबाबत' असंख्य महिला मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतात तेव्हा...
राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा
Nupur Chilkulwar

|

Jan 29, 2021 | 1:28 PM

चंद्रपूर : आम्हाला हक्काचे आणि अधिकृत घर हवे, या मागणीसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील (Minister Jayant Patil Meet Women) मूळ शहरातील असंख्य महिलांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. जयंत पाटी सध्या राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असताना गुरुवारी रात्री एक वाजता या महिनांनी त्यांची भेट घेत ही मागणी केली (Minister Jayant Patil Meet Women).

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे 28 जानेवारीपासून विदर्भ आणि खान्देश राष्ट्रवादी परिवार संवाद दौर्‍यावर असताना चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ शहरातील असंख्य महिलांनी भेट घेत गार्‍हाणी मांडली.

Jayant Patil, NCP, Chandrapur

राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सिक्युरिटीच्या गराड्यातून आपला ताफा थांबवत जमलेल्या महिलांची भेट घेतली. यावेळी महिलांनी अधिकृत घरे करुन मिळावित अशी मागणी केली. यावेळी सर्वांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत तुमच्या मागणीचा नक्कीच विचार करतो असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले.

इतक्या रात्री एक मंत्री आपल्याला भेटतात आणि आपल्या समस्या जाणून घेतात याबद्दल महिलांच्या चेहर्‍यावर समाधान पाहायला मिळाले. दरम्यान, शुक्रवारी मूल शहरातील असंख्य महिलांची मागणीबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी दिल्या.

Minister Jayant Patil Meet Women

संबंधित बातम्या :

शेतकऱ्यांवर लाठीचार्ज; मोदींची ही वागणूक शेतकरी कायम लक्षात ठेवतील: जयंत पाटील

केंद्र सरकार हट्टीपणे वागले नसते तर ही वेळच आली नसती: जयंत पाटील

जयंत पाटील महाराष्ट्र दौऱ्यावर; काय आहे राष्ट्रवादीचा प्लॅन?

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें