अडीच वर्षीय वैदिशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, 200 देशांच्या राजधानी आणि राष्ट्रध्वज तोंडपाठ

वैभव आणि दीपाली शेरेकर यांची कन्या असलेल्या वैदिशाच्या स्मरणशक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Vidisha Sherekar India Book of Records)

  • निलेश डाहाट, टीव्ही 9 मराठी, चंद्रपूर
  • Published On - 16:46 PM, 23 Jan 2021
अडीच वर्षीय वैदिशाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद, 200 देशांच्या राजधानी आणि राष्ट्रध्वज तोंडपाठ

चंद्रपूर : जवळपास 200 देशांच्या राजधानी, त्यांचे राष्ट्रध्वज लक्षात ठेवणे खरचं कठीण आहे. पण चंद्रपूरच्या एका अडीच वर्षीय मुलीला हे सर्व तोंडपाठ आहे. वैदिशा शेरेकर असे या चिमुरडीचे नाव आहे. या चिमुरडीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूरच्या वैभव आणि दीपाली शेरेकर यांची कन्या असलेल्या वैदिशाच्या स्मरणशक्तीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (Chandrapur Vidisha Sherekar Name Include in India Book of Records)

वैदिशा वय वर्षे अडीच. धावण्या, पळण्याच्या वयात तिला जगभरातील 200 पेक्षा अधिक देशांच्या राजधान्या तोंडपाठ आहे. फक्त राजधानी नव्हे, तर कोणत्या देशाचा राष्ट्रध्वज कोणता हेही ती पटापट सांगते. तिच्या या अफाट बुद्घीमत्तेची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे.

वैदिशा शेरेकर हिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सामाविष्ट करण्यात आले आहे. नुकतंच तिचा राष्ट्रीय स्तरावर गौरव करण्यात आला.

मूळचे अकोला येथील वैभव शेरेकर हे चंद्रपुरात बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे. वैभव आणि दीपाली यांची वैदिशा ही एकुलती एक मुलगी. वैदिशा दीड वर्षांची असताना तिच्या वडिलांनी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून फळे, भाजीपाला, पक्षी, प्राणी यांचे चार्ट तिच्यासाठी आणले. घरातील भिंतीवर चिटकवून वैदिशाला त्याची ओळख करून दिली. अवघ्या एक-दोन दिवसांत ती अचूक पक्षी, फळे, प्राणी ओळखू लागली. तेव्हाच तिच्यातील बुद्धिमत्तेची कल्पना शेरेकर दाम्पत्याला आली.

त्यानंतर वैभव शेरेकर यांनी वैदिशाला मोबाईलमध्ये विविध देश, त्यांची राजधानी, त्यांचे ध्वज यांची माहिती दाखविली. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी तिला ते परत दाखवण्यात आले. तेव्हा वैदिशाने न चुकता देश, राजधानी आणि ध्वज ओळखले. त्यानंतर त्यांनी विविध देश, तेथील राजधानी आणि ध्वजाचा चार्ट वैदिशासाठी आणला.

नोव्हेंबर महिन्यांपासून आईने तिला देश, राजधानी, ध्वज याची माहिती देण्यास सुरुवात केली. काही दिवसांतच वैदिशाने विचारलेले देश, त्यांची राजधानी पटापट सांगायला सुरुवात केली. वैदिशाची बुद्धिमत्ता बघून तिचे नाव इंडिया बुक ऑफ रेकार्डमध्ये नोंद करण्याचे ठरले.

त्यानुसार शेरेकर यांनी वैदिशाची संपूर्ण माहिती, ती सांगत असलेला व्हिडीओ तयार करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डला पाठविले. यानंतर इंडिया बुकनेही त्याची दखल घेत तिचे नाव इंडिया बुकमध्ये समाविष्ट केले. इंडिया बुक ऑफ रेकार्डनुसार भारतातील ती अशी एकमेव मुलगी असल्याचा दावा तिच्या पालकांनी केला आहे. (Chandrapur Vidisha Sherekar Name Include in India Book of Records)

संबंधित बातम्या : 

बाळासाहेबांची शिवसेना विकली त्या संजय राऊतांनी हिंदुत्व शिकवू नये – भाजप

जयंत पाटील अनुकंपा निकषावर राजकारणात; पडळकरांची खोचक टीका