AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! OBCसाठी छगन भुजबळ मैदानात, काढला तातडीचा आदेश, पडद्यामागे घडामोडींना वेग

सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न निष्पळ ठरला. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, आता जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.

मोठी बातमी! OBCसाठी छगन भुजबळ मैदानात, काढला तातडीचा आदेश, पडद्यामागे घडामोडींना वेग
manoj jarange patil and chhagan bhujbal
| Updated on: Aug 31, 2025 | 2:58 PM
Share

Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे मुंबईत येऊन आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले आहेत. सरसकट मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या या मागणीला अनेक आमदार, खासदारांनी पाठिंबा दिला आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकारने जरांगे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न निष्पळ ठरला. आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण हवं, अशी त्यांची मागणी आहे. दरम्यान, आता जरांगे यांच्या या मागणीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून पहिल्यांदाच मंत्री छगन भुजबळ सक्रिय झाले आहेत. त्यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे.

जरांगेंचे आंदोलन तीव्र, भुजबळ आता सक्रिय

मनोज जरांगे यांनी यांनी मुंबईत येऊन आंदोलन चालू केले तेव्हापासून ओबीसी नेते लक्ष्मण हाके चांगलेच आक्रमक झाले आहेत. राज्यभरात ओबीसी संघटना उपोषणाला बसण्याच्या तयारीत आहेत. नागपूरमध्ये साखळी उपोषणाला सुरुवातही झाली आहे. तर जालना जिल्ह्यात येत्या 1 सप्टेंबरपासून ओबीसी संघटना आपले उपोषण चालू करणार आहेत. या सर्व घडामोडींत ओबीसी समाजाची बाजू लावून धरणारे तसेच जरांगे यांच्या मागण्यांचा विरोध करणारे छगन भुजबळ मात्र कुठेच दिसत नव्हते. जरांगे यांचे आंदोलन तीव्र झाल्यामुळे मात्र भुजबळ सक्रिय झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार भुजबळ यांनी राज्यातील ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे.

सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलवलं

भुजबळ यांनी राज्यातील सर्व ओबीसी नेत्यांना मुंबईत बोलावले आहे. 1 सप्टेंबर रोजी ओबीसी नेत्यांनी मुंबईत यावे आणि बैठकीत सहभागी व्हावे, असा संदेश भुजबळ यांनी दिलआ आहे. त्यामुळे आता ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा होणार? या बैठकीतून नेमकी काय भूमिका घेतली जाणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्यातरी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये, अशीच भूमिका सर्व ओबीसी नेत्यांची आहे. त्यामुळे भुजबळ यांच्या नेतृत्त्वाखाली होणाऱ्या या बैठकीत ओबीसी नेते आंदोलनाची हाक देणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;
Gunratna Sadavarte : एकनाथ शिंदे येणाऱ्या काळात मुख्यमंत्री होऊच शकत नाही...;  गुणरत्न सदावर्तेंचं गाण्यातून भाकीत
माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर
Ravindra Dhangekar : माझ्या लेव्हलला आलो तर महाराष्ट्रातही फिरु देणार नाही, रवींद्र धंगेकर यांनी नेमकं कोणाला सुनावलं?
ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर..
Kumbh Mela Update : ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय; त्र्यंबकेश्वर मंदिर आज भाविकांसाठी राहणार बंद
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद! राष्ट्रपतींच्या हस्ते
Nashik Kumbh : नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याचा शंखनाद, राष्ट्रपतींच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण; एका ऐतिहासिक पर्वाला सुरुवात
ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
Devendra Fadnavis : ठाकरे बंधूंसोबतच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका वाक्यात उत्तर; म्हणाले...
मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; शेलारांच्या विधानाने चर्चांना उधाण
Ashish Shelar : मी दाऊदबरोबर बसू शकत नाही, पण...; आशिष शेलारांच्या एका विधानाने राजकीय चर्चांना उधाण
दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका
Gunratna Sadavarte : दाढीवाला अजगर... गुणरत्न सदावर्तेंची एकनाथ शिंदेंवर जहरी टीका; पूर्णेकर प्रकरणावरून आरोप- प्रत्यारोपांची मालिका सुरूच
सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार, राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे....
Minakshi Shinde : सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच देणार..., राजीनाम्यानंतर मिनाक्षी शिंदे पहिल्यांदाच बोलल्या; आरोपांवर काय म्हणाल्या?
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू