छत्रपती संभाजी राजेंची शिवसेना खासदारावर स्तुतिसुमनं, पवार कुटुंबावर निशाणा

जर का पुढचा उमेदवार निवडून आला असता, तर सामान्य माणसाचा पराभव झाला असता, असं म्हणत पार्थ पवारांचं नाव न घेता छत्रपती संभाजी राजेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

Chhatrapati Sambhaji Raje on Parth Pawar, छत्रपती संभाजी राजेंची शिवसेना खासदारावर स्तुतिसुमनं, पवार कुटुंबावर निशाणा

पिंपरी चिंचवड : राज्यसभेचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मावळमधील शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला (Chhatrapati Sambhaji Raje on Parth Pawar) आहे.

आप्पा (श्रीरंग बारणे) यांच्यामध्ये जी तळमळ दिसते, ती फार कमी खासदारांमध्ये असते. आप्पांपेक्षा एकाच गोष्टीत मी सरस आहे, त्यांची उपस्थिती 91 टक्के आहे, तर माझी 99 टक्के. तात्पर्य काय, तर 90 टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती राखणं सोपं नाही, असं छत्रपती संभाजी राजे म्हणाले. पुण्यात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

जेव्हाही मी तेव्हा फोन करायचो, कुठे आहात आप्पा तुम्ही? ज्या मिनिटाला अधिवेशन संपायचं, त्याच्या पुढच्या क्षणाला मतदारसंघात कसं पोहचायचं, यासाठी त्यांची तळमळ असते. दुसऱ्या दिवशी फोन केला कुठे आहात? तर अधिवेशनाला न चुकता ते हजर असतात, तुम्ही निवडून दिलेला खासदार सार्थ आहे, अशा शब्दात छत्रपती संभाजी राजेंनी श्रीरंग बारणेंचं कौतुक केलं.

मावळ लोकसभा निवडणुकीच्या वेळी नेमकी काय परिस्थिती आहे, यासाठी युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना माझा सारखा फोन असायचा. आप्पा, काय परिस्थिती आहे? बारणे म्हणायचे, राजे काही काळजी करु नका. तुम्हाला काळजी नाही हो, पण आम्ही तिथे बसलेलो असायचो पश्चिम महाराष्ट्राच्या टोकाला, कोपऱ्यात, तिथे आमची धाकधूक वाढत होती. जर का पुढचा उमेदवार निवडून आला असता, तर सामान्य माणसाचा पराभव झाला असता अशी आमच्या मनात भीती होती, असं म्हणत पार्थ पवारांचं नाव न घेता छत्रपती संभाजी राजेंनी अप्रत्यक्ष टोला लगावला.

लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढलेल्या शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे खासदारपदी निवडून आले आहेत. पुण्यातील मावळ मतदारसंघात त्यांनी सलग दुसऱ्यांदा शिवसेनेचा झेंडा फडकावला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर उतरलेल्या पार्थ पवारांचा त्यांनी पराभव केला. (Chhatrapati Sambhaji Raje on Parth Pawar)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *