शिवरायांनी सुरत लुटली नाही, ते लुटारू नव्हते… देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका..
Devendra Fadnavis interview : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केलेल्या आरोपांवर थेट उत्तर देताना आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. शिवसेना ठाकरे गटावर त्यांनी गंभीर आरोप केले.

29 महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. त्यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपावर काही गंभीर आरोप करण्यात आली. पहिल्यांदाच मनसे आणि ठाकरे गट एकत्र येऊन महापालिका निवडणुका लढत आहे. भाजपावर अनेक गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केली. फक्त आरोपच नाही तर भाजपाकडून मुंबई लुटली जात असल्याचेही त्यांनी म्हटले. मुंबई महापालिकेचा महापाैर हा मराठी आणि आमचा होईल, असा दावा राज ठाकरे यांनी केला. त्यानंतर भाजपाने स्पष्ट करत म्हटले की, हिंदूच मुंबई महापालिकेचा महापाैर होईल. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टिकेवर आता बोलताना देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. मुंबई कोण लुटत आहे आणि कोणी काय घोटाळे केले याचा पाढाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी tv9 च्या मुलाखतीमध्ये वाचून दाखवला. tv9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी देवेंद्र फडणवीस यांची महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुलाखत घेतली. यावर फडणवीसांनी अनेक गोष्टींवर थेट भाष्य केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पहिली गोष्ट तर माझा या गोष्टीला आक्षेप आहे. शिवरायांनी सुरत लुटली नाही. ते लुटारू नव्हते. त्यांना स्वारी केली. स्वराज्याचा खजिना मोघलांनी नेला होता. त्यांनी पत्र लिहिलं. त्यांनी तो आणला. शिवरायांना लुटारू म्हणणारे हे शिवाजी महाराजांचे अनुयायी आहे का?. मुंबई कुणी लुटली. 200 रस्त्यांचं ऑडिट झालं. रस्त्याच्या खाली पिक्यूसी नाही. कचरा घोटाळा केला. ट्रकच्या ऐवजी रिक्षाचे नंबर टाकले.
मिठी नदीत मित्रांना काम देऊन देऊन गाळ न काढता पैसे खाल्ले. तिथेही ट्रान्सपोर्टेशनसाठी काही गोष्टी दाखवल्या त्यात रिक्षा आणि स्कूटरचा नंबर दाखवला. कोव्हिडचा घोटाळा केला. डॉक्टर नर्स नसताना सेंटर उभारले. कित्येक लोकं त्यात मेले. घोटाळा करणारे यांच्या पक्षातील लोक होते. कफनचा म्हणजे बॉडी बॅगचा घोटाळा केला, असाही गंभीर आरोप यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीमध्ये शिवरायांनी सुरत लुटल्याचा उल्लेख केला होता. याला देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिले. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाने नक्की काय काय घोटाळे केले याचा पूर्ण पाढाच देवेंद्र फडणवीस यांनी वाचून दाखवला. गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राज ठाकरेही भाजपाला टार्गेट करून आरोप करताना दिसत आहेत.
