AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांना लाथ मारून हकलून द्या, नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे… उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले

मुंबईमध्ये आज शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला.

अजित पवारांना लाथ मारून हकलून द्या, नाही तर अजितदादांची जाहीर माफी मागा, तुमचे हेच चाळे... उद्धव ठाकरे यांनी भाजपला ठणकावले
उद्धव ठाकरे Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 11, 2026 | 10:10 PM
Share

आज मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची सभा पार पडली, या सभेत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली.  त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचं हिंदुत्व हे ढोंग आहे. काश्मीरमध्ये माता भगिनींचा सिंदूर पुसला गेला. त्यानंतर पाकिस्तानवर हल्ला करण्यात आला, ऑपरेशन सिंदूर केलं, आणि काही दिवसांनी याच पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला शहांचे चिरंजीव पुढे, हे यांचं देशप्रेम? असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला. उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर आघाडी केली तर उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं. मग फडणवीस  अंबरनाथमध्ये तुम्ही असं काय सोडलं? ईदच्या दिवशी मोदींना लहानपणी मुस्लिम कुटुंबाकडून जेवण यायचं. सौगात ए मोदी केली तरी चालतं. आम्ही साधं अमर शेखचं नाव घेतलं तर आम्ही हिंदूत्व सोडलं?  तुम्ही जे करताय ते काय अमरप्रेम आहे का? असा सवाल यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना भाजपला एका वर्षात ३१०० कोटी रुपये निधी मिळाला. राज्य आणि केंद्र सरकार त्यांचं आहे. महापालिकेला विविध करांच्या माध्यमातून जवळपास १० हजार ९०० कोटींची थकबाकी येणं बाकी आहे. यांच्या तिजोऱ्या भरत आहेत. मुंबई  लुटत आहे. तिकडे गणेश नाईक हे बोंब मारत आहेत, नवी मुंबई महापालिका कर्जबारी झाली आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं

७० हजार कोटींचे आरोप तुम्ही आणि मोदींनी केले, ढिगभर पुरावे दिले. केस चालू आहेत म्हणताय, पुरावे तुम्ही दिले ते पुरावे की जाळावे कोर्टाने सांगावं. तुम्हाला माहीत आहे पुरावे दिले, तर अजित पवारांना लाथ मारून हाकलून द्या. नसेल तर अजित पवारांची माफी मागा, हेच तुमचे चाळे चालू आहेत. लोकांना बदनाम करायचे, आयुष्यातून उठवायचे, असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.  मी फडणवीस यांना आव्हान देतो आजही या व्यासपीठीवर या चर्चा करा. आदित्यला सांगतो. तुम्ही मुद्द्याचं बोला. या लोकांना महापालिका शिवसेनेने दाखवली. या गद्दाराला मंत्री करण्याचं पाप मी केलं, हे अभिमानाने नाही शरमेने सांगावं लागतं असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना शिंदे गटाला देखील टोला लगावला आहे.

कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?
कधी तुमच्या दरवाज्यावर टक टक होईल...काय म्हणाले राज ठाकरे ?.
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
नाशिककरांनी सत्ता दिली होती पण... CM फडणवीसांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल.
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल
'महायुतीचा प्रचार भरकटलेला...' आदित्य ठाकरेंचा विरोधकांवर हल्लाबोल.
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला
जो राम का नाही वो काम का नाही! फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला.
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा
... मगच नवऱ्याला जेवण वाढा! पंकजा मुंडेंच्या विधानाची रंगली चर्चा.
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल
'ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला...' बड्या नेत्याचा ठाकरेंवर हल्लाबोल.
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल
निवडणूक प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षकाचा तो व्हिडीओ व्हायरल.
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज
हिंदू-मुस्लिम वादाशिवाय फडणवीसांचं भाषण दाखवा! उद्धव ठाकरेंचं चॅलेंज.
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले
'करून दाखवलं’ बॅनरवरून वाद पेटला: ठाकरे, फडणवीस, शिंदे एकमेकांवर बरसले.
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान
... तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही! सतेज पाटलांचं विधान.