AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून – CM फडणवीस

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

सरन्यायाधीश भूषण गवईंचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून - CM फडणवीस
Fadnavis on cji gawai
| Updated on: Jul 08, 2025 | 3:47 PM
Share

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा आज महाराष्ट्र विधीमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या प्रवासाचे वर्णन केले. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, गवई यांचा हा सत्कार फक्त विधीमंडळाकडून नव्हे तर 13 कोटी जनतेकडून आहे. गवई यांना सत्कारासंदर्भात विचारणा केली होती, तेव्हा त्यांनी फक्त सत्कार नको तर संविधानावर मार्गदर्शन ही ठेवा अशी मागणी केली. हा ⁠त्यांचा साधेपणा आहे. दादासाहेब गवई हे अजातशत्रू होते, त्यांचा गुण भूषण गवई यांनी घेतला.

पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, भूषण गवई सरन्यायाधीश झाले तरी कोशात गेले नाही. ते सरकारी वकिल होते त्यावेळी नागपूरमधील झोपडपट्टी तोडण्याचा निर्णय आला. त्यावेळी गवई साहेब सर्वोच्च न्यायालयात गेले आणि तो प्रश्न त्यांनी सोडवला. ⁠मुंबई उच्च न्यायालयात असताना अनेकदा कायदा आणि व्यापक जनहित असताना ही त्यांनी मार्ग काढला होता.

मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ‘वन विभागामुळे अनेक रस्त्यांची कामं रखडली होती मात्र गवई साहेबांनी त्यातून मार्ग काढला. ⁠⁠हायकोर्टात असताना ही ते वकिलांच्या बाजूने असायचे. आज ही वकिलांच मतदान घेतल तर त्यांना 3/4 मतदान होईल. ⁠एकही शनिवार किंवा रविवार ते दिल्लीत नाहीत. कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात ते असतात असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री अजित एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘आजचा दिवस आपल्या सर्वासाठी आनंदाचा आहे. आपल्या परिवारातील एक व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर बसलीय. भूषण गवई यांनी 14 मे रोजी शपथ घेतली. कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी काम केले. देशाला एक अस्सल हिरा मिळालाय. एवढ्या मोठ्या पदावर असून देखील त्यांच्यात एक शालिनता पहायला मिळाली. सर्वोच्च पदावर असूनही जमिनीवर पाय असलेले असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपल्या सेंटर हॉलमध्ये अनेक सत्कार झाले, पण आजच्या सत्काराची विधिमंडळामध्ये नोंद होणार आहे. आजच्या भाषणाची सुरुवात माय लॉर्ड अशी करायला हवी होती. लोकशाहीला अधिक बळकट करणारी अशी व्यवस्था आहे. लोकशाही व्यवस्थेत सर्वात मोठी जबाबदारी ही सरन्यायाधीश यांची असते. ही जबाबदारी आता भूषण गवई सांभाळत आहेत.

अंबादास दानवे यांनी म्हटले की, भूषण गवई यांचा आपण सत्कार करतोय. दोन्ही सभागृहाचा मी एकटाच विरोधी पक्ष नेता आहे . काल परवा कुणी तरी मराठी बद्दल बोललं पण दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा हे भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे. मराठावाडा आणि विदर्भातली माती काही वेगळी नाही. भूषण गवई आपल्या देशाचे सरन्यायाधीश झालेत. भूषण गवई यांनी प्राथमिक शिक्षण मराठी भाषेत घेतले. मराठी भाषेत शिक्षण घेतलेला व्यक्ती देखील देशाच्या सर्वोच पदावर जाऊ शकतो हे भूषण गवई यांनी दाखवून दिले आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.