काल नेते आज कार्यकर्ते भिडले; पडळकर, आव्हाडांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा, विधानभवनाच्या लॉबीमध्ये हाणामारी
पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.

मोठी बातमी समोर येत आहे, काल भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ देखील केली होती. हे प्रकरण ताजं असतानाच आता पडळकर आणि आव्हाड समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला आहे. विधानभवनाच्या लॉबीमध्येच दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले, यावेळी हाणामारी देखील झाल्याचं पाहायला मिळालं.
आव्हाडांचा गंभीर आरोप
दरम्यान यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी गंभीर आरोप केला आहे, मला मारण्यासाठी विधानभवनात गुंड आले होते, मात्र मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला आहे, विधानभवनात काय सुरू आहे? असा सवाल यावेळी आव्हाड यांनी केला आहे.
नेमकं काय घडलं?
विधानभवनाच्या लॉबीमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळालं, जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांचे कार्यकर्ते आपसात भिडले. लॉबीमध्येच हाणामारी देखील झाली. त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
बुधवारी आव्हाड आणि पडळकरांमध्ये राडा
दरम्यान बुधवारी काल जितेंद्र आव्हाड आणि गोपिचंद पडळकर यांच्यामध्ये जोरदार राडा झाला होता. विधानभवनाच्या दारातच दोन्ही नेते भिडले होते. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना शिवीगाळ देखील करण्यात आली. गोपीचंद पडळकरांच्या गाडीचा दरवाजा लागल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार वाद सुरू झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याचं पाहायला मिळालं.
त्यानंतर आज आता दोन्ही नेत्यांचे समर्थक भिडले आहेत, विधानभवनाच्या लॉबीमध्येच जोरदार राडा झाला, एकमेकांना मारहाण देखील करण्यात आली. त्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला. दरम्यान मला मारण्यासाठी विधानभवनात गुंड आले होते, मात्र मला न मारता माझ्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला असा गंभीर आरोप या प्रकरणावर बोलताना आव्हाड यांनी केला आहे. काल आव्हाड आणि पडळकर यांच्यामध्ये जोरदार राडा झाला, दोघांनीही एकमेकांना शिवीगाळ केली, त्यानंतर आज कार्यकर्ते भिडले त्यामुळे आता हे प्रकरण आणखी तापण्याची शक्यता आहे.
