अण्णांच्या सर्व मागण्या जवळपास मान्य, उपोषण मागे घ्या, मुख्यमंत्र्यांची विनंती

  • संतोष नलावडे, टीव्ही 9 मराठी, सातारा
  • Published On - 15:36 PM, 4 Feb 2019
अण्णांच्या सर्व मागण्या जवळपास मान्य, उपोषण मागे घ्या, मुख्यमंत्र्यांची विनंती

सातारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. अण्णांच्या उपोषणाच्या मागे उभे राहणाऱ्यांना हे प्रकरण भिजत ठेवायचं आहे, असा आरोप यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. ते साताऱ्यात बोलत होते. अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे.

“अण्णांच्या सर्व मागण्या जवळपास आम्ही माण्य केल्या आहेत. तसेच लोकायुक्‍त समिती नियुक्त करण्याचा आम्ही त्यांना होकार दिला आहे. केंद्र सरकारचे जे विषय आहेत, त्यावर त्यांना केंद्र सरकारच्या कार्यालयामधूनही पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांनी उपोषण मागं घ्यावं” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अण्णा, या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका : राज ठाकरे

अण्णांच्या उपोषणाबाबत आता जे त्यांना पाठिंबा देत आहेत, तेच पूर्वी त्यांच्याविरोधात बोलत होते, तेच आता अण्णांच्या पाठिशी उभे राहात आहेत. याचं कारण त्यांना हे प्रकरण असंच भिजत ठेवायचं आहे. त्यांना अण्णांच्या तब्बेतीची काळजी वाटत नाही, त्यामुळे अण्णांनी हे समजून घेऊन उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं.

अण्णांचं आंदोलन

केंद्रात लोकपाल नियुक्त करावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सुरु केले असून, आज या उपोषणाचा सहावा दिवस आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका अण्णांनी घेतली आहे. शिवाय, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या 8 किंवा 9 फेब्रुवारीला ‘पद्मभूषण’ पुरस्कार परत करेन, असा इशाराही अण्णांनी दिला आहे.

संबंधित बातम्या

अण्णा, या नालायकांसाठी जीवाची बाजी लावू नका : राज ठाकरे   

हे वाचाच, भारतीय म्हणून तुम्हालाही अण्णा हजारेंचा अभिमान वाटेल!  

LIVE : राज ठाकरे आणि अण्णांची बंद दाराआड चर्चा  

राळेगणसिद्धी : राज ठाकरे अण्णा हजारेंच्या भेटीला