मुख्यमंत्र्यांमागे हेलिकॉप्टर ससेमिरा सुरुच, चाकं चिखलात रुतली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis helicopter) यांच्या मागे हेलिकॉप्टरची ससेमिरा कायम आहे. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर रायगडमधील हेलिपॅडवरील चिखलात रुतलं.

मुख्यमंत्र्यांमागे हेलिकॉप्टर ससेमिरा सुरुच, चाकं चिखलात रुतली
Follow us
| Updated on: Oct 11, 2019 | 8:12 PM

रायगड :  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis helicopter) यांच्या मागे हेलिकॉप्टरची ससेमिरा कायम आहे. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर रायगडमधील हेलिपॅडवरील चिखलात रुतलं.  मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतहून हेलिकॉप्टरने (CM Devendra Fadanvis helicopter)  रायगडमध्ये आले. हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे उतरताना हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. मुख्यमंत्र्यांचं 7 टन वजनाचं चार्टर्ड हेलिकॉप्टर आहे. रायगड जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. मुख्यमंत्री अलिबागला आले होते त्यावेळीही त्यांच्या हेलिकॉप्टरला छोटीशी दुर्घटना झाली होती. आज पुन्हा रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर काहीसं दुर्घटनाग्रस्त झालं.

नेमकं काय घडलं?

हेलिपॅडवर चिखल असल्याने हेलिकॉप्टरची चाके मातीत रुतली. मात्र पायलटच्या प्रसंगवधानाने अनर्थ टळला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला आज पेण येथे अपघात झाला असता. पेण येथे प्रचार सभेसाठी त्यांचे हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे लॅण्ड झाल्यावर हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली. त्यामुळे पायलटचे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटले मात्र प्रसंगावधान दाखवत पायलटने पुन्हा नियंत्रण प्राप्त केले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. हेलिकॉप्टरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याचा पीए, एक इंजिनिइर, एक पायलट आणि को-पायलट हे पाचजण बसले होते.

हेलिगो चार्टर प्रा.लि.चे हे हेलीकॉप्टर होते. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथून सभा संपवल्यावर मुख्यमंत्री रायगड जिल्ह्यातील पेण येथे प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी रवाना झाले. पाऊस पडल्याने माती भिजली होती. त्यामुळे पेण-बोरगाव येथील हेलिपॅड चिखलासारखे झाले असावे. ४ वाजून २५ मिनिटे आणि ३० सेकंदानी पेण-बोरगाव येथे सात टन वजनाचे हेलिकॉप्टर लॅण्ड झाले. तेव्हा खाली चिखल असल्याने हॅलिकॉप्टरची चाके मातीत रुतल्याचे बोलले जाते.

त्यामुळे हेलिकॉप्टरवरील नियंत्रण सुटण्याच्या स्थितीत असतानाच पायलटने त्यावर नियंत्रण मिळवले. त्यानंतर सुखरुपपणे मुख्यमंत्री खाली उतरले आणि पेण येथील भाजपाचे उमेदवार रविंद्र पाटील यांच्या प्रचारसभेसाठी रवाना झाले. या घटनेबाबत अद्यापही कोणत्याच यंत्रणेने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, या आधीही मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात होण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून ते बालंबाल बचावले होते. आता पुन्हा असाच अपघात होताना ते बचावले आहेत.

हेलिकॉप्टर लॅण्ड होताना असे प्रकार होतात. त्यामुळे अपघात झालेला नाही. मुख्यमंत्री सुरक्षित खाली उतरले आणि पुन्हा काम संपवून परतले आहेत, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Non Stop LIVE Update
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.