AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही? सस्पेन्स संपला, थेट फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं, म्हणाले कुठेही…

देशात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार आहे, असा दावा केला जात आहे. यावरच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी इत्यंभूत माहिती दिली आहे.

देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार की नाही? सस्पेन्स संपला, थेट फडणवीसांनी सगळं सांगून टाकलं, म्हणाले कुठेही...
lockdownImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 28, 2026 | 4:28 PM
Share

Lockdown In India : अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध आता तात्पुरते थांबले आहे. इराण आणि अमेरिका यांच्यात हे युद्ध थांबवण्यासाठी चर्चा होत आहे. दुसरीकडे या युद्धामुळे भारताला वेगवेगळ्या पातळ्यांवर तोटा होत आहे. भारतात इंधनसंकट निर्माण झाले आहे. लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. पेट्रोल, डिजेल खरेदी करण्यासाठी लोक तासनतास क पेट्रोल पंपावर रांगा लागलेल्या दिसत आहेत. दुसरीकडे एलपीजी गॅस सिलिंडरही वेळेवर मिळत नाही. त्यामुळेच भविष्यात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे भविष्यात आता लॉकडाऊन लागणार आहे, असा दावा केला जात आहे. यावरच आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी लॉकडाऊन लागणार की नाही, याबाबतचा संभ्रम संपवून टाकला आहे.

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

देशात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार का? याबाबत विचारले असता, “काही लोक जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊन लागेल, असे सांगितले जात आहे. लॉकडाऊन अजिबात लागणार नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवणारे हे एका प्रकारे देशद्रोह करत आहेत,” असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच अशा पद्धतीने खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर आम्ही कडक कारवाई करू, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.

पीएनजी कनेक्शनसाठी सरकारचे प्रयत्न

राज्यात गॅस सिलिंडरची टंचाई जाणवू नये म्हणून सगळीकडे पीएनजी कनेक्शन घेण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. पाईप गॅस लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्याबाबतचा एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सगळ्या महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रात गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी अटी-शर्ती शिथील केलेल्या आहेत. या गॅस पाईप लान टाकल्या तर एलपीजीची गरज भासणार नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अफवांना बळी पडू नका

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी देशात कुठेही लॉकडाऊन लागणार नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा