AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांचे जुने मित्र, संजय राऊतांच्या विधानाने भुवया उंचावल्या

पंतप्रधान मोदींच्या बारामती दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांनी मोदींना शरद पवारांचे 'जुने मित्र' संबोधत टोला लगावला, ज्यामुळे भुवया उंचावल्या. राऊत यांनी शिंदे गटावरही जोरदार टीका केली, MPSC आंदोलनातील विद्यार्थ्यांचा रोष आणि दिल्लीतील अनावश्यक भेटींवरून सरकारला धारेवर धरले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवारांचे जुने मित्र, संजय राऊतांच्या विधानाने भुवया उंचावल्या
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 05, 2026 | 10:39 AM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारामतीत येत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मोदी आणि पवारांच्या मैत्रीचीही या निमित्ताने चर्चा सुरू झाली असून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावरून शरद पवार यांना टोला लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शरद पवार यांचे जुने मित्र आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. संजय राऊत यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येणार आहेत. त्याबाबतचा प्रश्न पवारांना विचारा. हा मोदींचा अखेरचा काळ आहे. त्यामुळे राजकारण आणि सत्तेतील त्यांचा शेवटचा कालखंड कदाचित बारामतीतूनच सुरू होईल. जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत मोदी देशाच्या सत्तेत असतील की नाही शंका आहे. पुढच्या काळात मोदी सत्तेत दिसणार नाही. मोदी आणि ज्ञानेश कुमार यांना जावं लागतंय. त्यामुळेच मोदी आता जुन्या मित्रांना भेटत आहेत. मोदी बारामतीत आले म्हणून काय झालं? फक्त सुनेत्रा पवारांच्या निमंत्रणावरून आले पाहिजे का? मोदी हे पवारांचे जुने मित्र आहेत, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

पण प्रतिष्ठा देऊ शकत नाही

काल पुण्यातील एमपीएससी आंदोलनात शिंदे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर आले होते. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना विरोध केला. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ओमराजेंना विद्यार्थ्यांनी केवळ हटकलं नाही, तर झटकलं. विद्यार्थ्यांनी गद्दार गद्दारच्या घोषणा दिल्या. शिंदे सोबत गेलेल्यांना अपमानित व्हावं लागत आहे. तुम्हाला एकनाथ शिंदेंनी पाच पन्नास कोटी दिले असतील. पण प्रतिष्ठा देऊ शकत नाही. शिंदे तुम्हाला पोलिसांच्या दोन गाड्या देऊ शकतात. पाच पन्नास कोटी देऊ शकतात. यापलिकडे ते काही देऊ शकत नाही, असं राऊत म्हणाले.

लाज वाटली पाहिजे…

एकनाथ शिंदे हे दिल्लीत गेले आहेत. त्यावरही त्यांनी टीका केली. एकनाथ शिंदे हे अमित शाहांच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतात. त्यांना सतत अमित शाहांना भेटायला जावं लागतं. त्यामुळे अमित शाह यांनी त्यांना पेइंग गेस्ट बनून राह्यला सांगितलं असेल. राज्यात दुष्काळ आहे. लोक रस्त्यावर आहेत. भ्रष्टाचाराचा डोंगर वाढला आहे आणि हे लोक दिल्लीत जाऊन गृहमंत्र्यांच्या लॉनवर गवतावर बसतात. लाज वाटली पाहिजे. या लोकांनी महाराष्ट्राची लाज काढली. विधान परिषदेच्या एका जागेसाठी दिल्लीत जाता? अरे हेच काम आहे का? या कठिण परिस्थितीत राज्यकर्त्यांनी राज्यात राहिलं पाहिजे. दुष्काळी भागात गेलं पाहिजे. तुम्ही तर यादी घेऊन एका जागेसाठी दिल्लीत जात आहात, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

मैत्रीपूर्ण लढणार

यावेळी त्यांनी ठाकरे गट अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरच्या दोन जागा लढणार असल्याचं सांगितलं. ही मैत्रीपूर्ण लढत आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी...
MPSC विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधी मैदानात; पुण्यातील आंदोलनस्थळी जाणार
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा