AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Party : शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!

देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटीदेखील घेतल्याचे बोलले जात आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार यांच्या पक्षाबाबत विचारणा करण्यात आली.

Sharad Pawar Party : शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार...देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!
sharad pawar and devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 07, 2026 | 7:28 PM
Share

Devendra Fadnavis : राज्याच्या राजकारणात सध्या वेगळेच वारे वाहू लागले आहेत. कधी काय होईल, हे सांगणे कठीण होऊन बसले आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या पक्षात मोठी फूट पडली. सहा खासदारांनी तसेच सचिन अहिर या आमदारांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पक्षात प्रवेश केला. ठाकरे यांच्या पक्षात फूट पडल्यानंतर आता खासदार शरद पवार यांच्याही पक्षात फूट पडणार असल्याचा दावा केला जातोय. लवकरच शरद पवार यांचा पक्ष एनडीएत सामील होण्याचीही शक्यता काहीजण व्यक्त करत आहेत. दरम्यान, आता याच चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार की नाही, हे थेट सांगून टाकलं आहे.

शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही

देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान फडणवीस यांनी काही राजकीय भेटीदेखील घेतल्याचे बोलले जात आहे. या दिल्ली दौऱ्यादरम्यान फडणवीस यांना शरद पवार यांच्या पक्षाबाबत विचारणा करण्यात आली. यावर बोलताना शरद पवार यांचा पक्ष एनडीएसोबत येणार नाही. ही एक पेरलेली बातमी आहे. यात कुठलेही तथ्य नाही. महाराष्ट्रात एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

पवार यांचे आमदार किंवा खासदारही…

तसेच महाराष्ट्रातून एनडीएत कोणताही नवा पक्ष येणार नाही. आम्ही आमच्यासोबत कोणालाही जोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच पवार यांचे आमदार किंवा खासदारही भविष्यात आम्ही फोडणार नाही, असेही फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले.

रोहित पवार यांनी काय माहिती दिली?

दरम्यान, शरद पवार यांचा पक्ष थेट एनडीएत सहभागी होऊ शकते, असा दावा केला जातोय. तर काहीजण एनडीएला बाहेरून पाठिंबा दिला जाऊ शकतो, असेही दावे केले जातायत. याच दाव्यांवर शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही एनडीएला पाठिंबा देणार नाही, असे रोहित पवार म्हणाले आहेत. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा