77% मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले पत्रकार, मिळाले मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या मुक्त विद्यापीठातून पत्रकारितेची पदविका पूर्ण केली. या परीक्षेमध्ये त्यांना 77% गुण मिळाले आहेत

77% मिळवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले पत्रकार, मिळाले मुक्त विद्यापीठाचे प्रमाणपत्र
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 9:24 AM

CM Eknath Shinde : राज्यातील सत्ता संघर्षासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. सतत राज्यातील राजकीय पेचप्रसंगाचा सामना करावा लागणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून (Yashwantrao Chavan Open University) पत्रकारितेची पदवी (Journalism Degree) पूर्ण केली आहे. या परीक्षेमध्ये त्यांना 77% गुण मिळाले आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार म्हणूनही ओळखले जाणार आहेत.

कुलगुरू डॉ. प्रशांत कुमार पाटील यांनी बुधवारी संध्याकाळी ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात शिंदे यांना प्रमाणपत्र दिले. एकनाथ शिंदे यांनी वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदविका शिक्षणक्रमाचे प्रमाणपत्र सुपूर्द करण्यात आले. यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी मुक्त विद्यापीठाची बी.ए. पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण मुक्त विद्यापीठातून घेतले असून पत्रकारितेचा पदविका शिक्षणक्रम ऑगस्ट 2021 मध्ये विशेष प्राविण्यासह अर्थात 77.25 टक्के गुण मिळवून पूर्ण केला होता. त्याचा पदवी प्रदान सोहळा पार पडला.

विद्यापीठाचा नावलौकिक वाढला

महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे ध्येय व स्वप्न पूर्ण करणाऱ्या नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून एकनाथ शिंदे यांनी शिक्षण घेतले. त्यांच्या या यशाने विद्यापीठाच्या नावलौकिकात भर पडली आहे. त्यांना प्रमाणपत्र देताना विशेष आनंद होत असल्याचे कुलगुरूंनी नमूद केले.

यापूर्वी शिंदे यांनी वायसीएमओयूमधून बीए केले आहे. याशिवाय एकनाथ शिंदे यांनी पदवी आणि मानवाधिकार विषयातील प्रमाणपत्र अभ्यासक्रमही पूर्ण केला आहे.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्राचे व देशाचेही लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षा सदंर्भात सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निकाल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर प्रतिक्रिया दिली.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.