राहुल गांधी यांना शिक्षा झाले ती फक्त ‘या’ कारणामुळे ; काँग्रेसने आंदोलन करत भाजपला खडेबोल सुनावले

राहुल गांधींनी संसदेत सातत्याने अदाणी विरोधात प्रश्न उपस्थित करतात. त्याचे उत्तर पंतप्रधान मोदी देऊ शकले नाही. त्यामुळे भाजपकडून राहुल गांधींना अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

राहुल गांधी यांना शिक्षा झाले ती फक्त 'या' कारणामुळे ; काँग्रेसने आंदोलन करत भाजपला खडेबोल सुनावले
Follow us
| Updated on: Mar 23, 2023 | 5:28 PM

परभणी : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांनी चोरों का सरनेम मोदी क्यों होता है असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला होता. मात्र आता तोच टोला राहुल गांधी यांना महागात पडला आहे. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची त्यांना शिक्षा ठोठवली आहे. त्यामुळे आता काँग्रेस कार्यकर्ते जोरदार आक्रमक झाले आहेत.

राहुल गांधी यांना न्यायालयाकडून शिक्षा ठोठवण्यात आल्यानंतर ठिकठिकाणा काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक होत भाजपविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाकडून शिक्षा ठोठवण्यात आल्यानंतर काँग्रेस आक्रमक होत. त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी केली आहे.

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना मोदी नावाच्या अवमान केल्या प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा ठोठावल्यानंतर राज्यभरात काँग्रेस आक्रमक झाली आहे परभणीतही काँग्रेसकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे जिल्हाप्रमुख आणि आमदार सुरेश वाडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे.

राहुल गांधी सातत्याने गुजरातमध्ये भाजप विरोधात आवाज उठवत आहेत, आणि त्या विवंचनेतूनच राहुल गांधी यांच्या विरोधात बोगस केस करण्यात आली होती.

त्यात राहुल गांधी यांना न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा दिली असल्याचे मत काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे बोगस तक्रार करणाऱ्या गुजरात सरकार विरोधात हा आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

भाजपकडून राहुल गांधी यांना खरंतर अडकवण्याचा हा प्रयत्न आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत राहुल गांधी यांच्याकडून काढण्यात आलेली भारत जोडो यात्रा यामुळे भाजप सरकार हतबल झालेले आहे.

त्यामुळेच राहुल गांधी यांना कुठे ना कुठे भाजपकडून अडकवण्याचा भाजपकडून सुरु असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.त्याच विवंचनेतून ही बोगस केस करण्यात आल्याचा आरोपीही यावेळी करण्यात आला.

राहुल गांधींनी संसदेत सातत्याने अदाणी विरोधात प्रश्न उपस्थित करतात. त्याचे उत्तर पंतप्रधान मोदी देऊ शकले नाही. त्यामुळे भाजपकडून राहुल गांधींना अडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल
भाजप म्हणतय देशद्रोही, तेच सत्ताधाऱ्यांचे सहकारी? सकाळी सवाल नंतर बवाल.
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार
मराठा आरक्षण मिळणार की नाही? कोर्टाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार.