AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाचा वर तर ठाकरे गटाची वधू, दोन्ही गटातील विवाह सोहळ्याची चर्चा रंगली

Thane News Thackeray and Shinde | राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले आहे. परंतु दोन्ही गटाचे नेते एकत्र आले. दोन्ही गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये हा विवाह झाला. ठाकरे आणि शिंदे गटातील नेते यावेळी एकत्र आले. त्यांच्यात चांगल्या गप्पा रंगल्या.

शिंदे गटाचा वर तर ठाकरे गटाची वधू,  दोन्ही गटातील विवाह सोहळ्याची चर्चा रंगली
| Updated on: Dec 22, 2023 | 12:08 PM
Share

गणेश थोरात, ठाणे, दि.22 डिसेंबर | राज्यात गेल्या वर्षभरात अनेक बदल झाले. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडला. एकनाथ शिंदे यांना शिवसेना मिळाली तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झाली. शिवसेनेतील या फुटीनंतर ठाकरे आणि शिंदे गट एकमेकांवर नेहमी शाब्दीक हल्ले करत आहेत. एकमेकांवर टीकेची एकही संधी दोन्ही गटाकडून सोडली जात नाही. दोन्ही गटांमध्ये अनेकदा हामारीतुमरी झाली आहे. परंतु ठाणे शहरात झालेल्या एका विवाहाची चर्चा रंगली आहे. ठाकरे आणि शिंदे गटात हा विवाह झाला. या विवाह सोहळ्याल दोन्ही गटाचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते आले. त्यांच्यात गप्पा रंगल्या. पगंतीमध्ये आग्रहाने जेवण वाढले गेले. यामुळे विवाह सोहळ्याला आलेल्या सर्वांना वेगळेच दृष्य पाहण्यास मिळाले.

दोन्ही गटाचे सूर जुळले

राज्याच्या राजकारणात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट एकमेकांशी वैर वाढलेले आहे. दोन्ही गटात वैर होण्यास सुरुवात ठाण्यातून झाली. या ठाण्यात एका विवाहाची चर्चा जोरदार चालू आहे. हा विवाह म्हणजे शिंदे गट आणि उद्भव ठाकरे गटामधील आहे. यानिमित्ताने दोन्ही गटातील नेते कार्यकर्ते एकत्र येताना दिसून आले. आमदार रवींद्र फाटक यांचे स्वीय सहाय्यक आणि सामाजिक कार्यकर्ते अजिंक्य गावकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हा समन्वयक अॅड.आरती खळे यांचा शुभ विवाह ठाण्यातील घोडबंदर परिसरात पार पडला. यावेळी दोन्ही गटाचे सूर जुळलेले यानिमित्ताने पाहायला मिळाले.

दोन्ही गटाचे अनेक दिग्गज एकत्र

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार रवींद्र फाटक, नाशिक संघटक हेमंत पवार तर ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई, राजन विचारे यांच्या पत्नी माजी नगरसेविका नंदिनी विचारे, माजी नगरसेवक नरेश मणेरा आणि स्थानिक शिंदे आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र एकाच ठिकाणी आल्याने पाहायला मिळाले. यामुळे एक विवाह असाही, अशी चर्चा रंगली.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.