Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 1588 नवे कोरोनाबाधित, 43 रुग्णांचा मृत्यू

| Updated on: Jun 04, 2021 | 11:24 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 1588 नवे कोरोनाबाधित, 43 रुग्णांचा मृत्यू
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानंतर आता ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करुन त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात येतील, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jun 2021 09:32 PM (IST)

    साताऱ्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच, दिवसभरात तब्बल 1588 नवे कोरोनाबाधित, 43 रुग्णांचा मृत्यू

    सातारा कोरोना अपडेट :

    1588 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित 43 बाधितांचा मृत्यू

    836 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

    सातारा जिल्हा कोरोना आकडेवारी

    एकूण नमुने -835039 एकूण बाधित – 172085 घरी सोडण्यात आलेले – 151225 मृत्यू – 3801 उपचारार्थ रुग्ण- 17055 सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 04 Jun 2021 08:26 PM (IST)

    विजय वडेट्टीवार त्या खात्याचे मंत्री, त्यामुळे त्यांनी स्टेटमेंट केलं : नाना पटोले

    नाना पटोले:

    विजय वडेट्टीवार त्या खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी स्टेटमेंट केलं

    मात्र मुख्यमंत्री प्रमुख असतात त्यांच्याकडे काही योजना असतील ते त्या प्रमाणे घोषणा करतील

    आज विरोधक बेंबीच्या देठापासून ओरडतात आहे, मात्र त्यांच्या सरकारमध्ये काय सुरू होत ते त्यांनी पाहावं

    ते उदारहान शोधून काढा त्यांच्यात ताळमेळ नव्हता

    कोविड परिस्थितीमध्ये लोकांमध्ये रोजगार आणि मरणाची भीती आहे, त्यातून सकारात्मक मार्ग काढावा ही सरकारची भूमिका आहे

    केंद्र सरकारप्रमाणे आमची भूमिका नाही

    सरकार समन्वयाने सुरू आहे

    सरकारमध्ये कुठलीही काही गडबड नाही

    अधिसूचना निघेल विचारपूर्वक अशी sop निघेल

  • 04 Jun 2021 07:40 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 14 हजार 152 नवे कोरोनाबाधित, 289 जणांचा मृत्यू

    आज राज्यात 14152 नविन कोरोना रुग्ण आज राज्यात डिस्चार्ज 20852 आज राज्यात 289 जणांचा मृत्यू राज्यात 196894 अँक्टीव रुग्ण

  • 04 Jun 2021 07:15 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 585 नवे कोरोनाबाधित

    नाशिक :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 938

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 585

    नाशिक मनपा- 194 नाशिक ग्रामीण- 372 मालेगाव मनपा- 08 जिल्हा बाह्य- 11

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4870

    आज कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -40 नाशिक मनपा- 21 मालेगाव मनपा- 01 नाशिक ग्रामीण- 17 जिल्हा बाह्य- 01

  • 04 Jun 2021 07:14 PM (IST)

    अकोलेकरांना थोडा दिलासा, दिवसभरात 93 नवे कोरोनाबाधित, 7 जणांचा मृत्यू

    अकोल्यात कोरोना अपडेट :

    अकोलेकरांना थोडा दिलासा

    अकोल्यात आज दिवसभरात 93 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 7 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत 1095 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 51920 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 3376 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 417 जण कोरोना मुक्त झाले आहेत

  • 04 Jun 2021 07:09 PM (IST)

    वैद्यकीय सेवा वगळता नाशिकमध्ये सर्व दुकाने, आस्थापना शनिवार-रविवार राहणार संपूर्णतः बंद

    - वैद्यकीय सेवा वगळता नाशिकमध्ये सर्व दुकाने,आस्थापना शनिवार रविवार राहणार संपूर्णतः बंद - हॉटेल,फूड टॉल्स मध्ये फक्त होम डिलिव्हरी राहणार सुरू - एरवी दुकान, आस्थापना सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यँत राहणार सुरू - नागरिकांनी विनाकारण गर्दी करू नये अन्यथा,पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यास भाग पडेल - जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांची माहिती

  • 04 Jun 2021 07:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 349 नवे कोरोनाबाधित, 33 बाधितांचा मृत्यू

    पुणे :  - दिवसभरात ३४९ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात ६९९ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १२. - ७२१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७१५७७. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४८४२. - एकूण मृत्यू -८३६१. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५८३७४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७८७१

  • 04 Jun 2021 07:05 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 197 नवे कोरोनाबाधित, 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    नागपूर :

    नागपुरात आज 197 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद

    428 जणांनी केली कोरोना वर मात

    तर 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या 475399

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या 461881

    एकूण मृत्यू संख्या - 8943

  • 04 Jun 2021 06:09 PM (IST)

    औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय, 45 वर्षांवरील नागरिक लस नाही घेता रस्त्यावर फिरल्यास होणार दंड

    औरंगाबाद  :-

    औरंगाबाद महापालिकेचा मोठा निर्णय

    45 वर्षांवरील नागरिक लस नाही घेता रस्त्यावर फिरल्यास होणार दंड

    औरंगाबाद महापालिकेच्या आरोग्य अधिकारी नीता पडळकर यांची माहिती

    45 वर्षांवरील नागरिकांसाठी कोरोना लस सक्तीची

    कोरोना बचावासाठी जास्तीत जास्त लसीकरण व्हावे या उद्देशाने निर्णय

    लस न घेता फिरल्यास दंड लावण्याचा प्रस्ताव

  • 04 Jun 2021 05:49 PM (IST)

    अखेर मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द, मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा संपुष्टात

    अखेर मुंबई महापालिकेचे ग्लोबल टेंडर रद्द

    निविदेत सहभाग घेतलेल्या 9 कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र ठरली नाही

    एकाही लस उत्पादक कंपनीचा निविदा प्रक्रियेत सहभाग नव्हता

    मुंबईकरांना लवकर लस मिळण्याची आशा संपुष्टात

  • 04 Jun 2021 05:22 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात अखेर कोरोना रुग्णांचा आकडा घसरला, दिवसभरात 86 नवे रुग्ण

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात कोरोनाचा आलेख खाली येत असून तीन महिन्यांत पहिल्यांदाच मागील दोन दिवसात दोन अंकी संख्येत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत

    जिल्ह्यात आज नवे आढळले 86 रुग्ण

    तर आज 314  जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    तसेच 02 रुग्णांचा झाला मृत्यू

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 40439

    सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 1363

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 38486

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 589

    वाशिम जिल्ह्यात 30 मे ते 04 जून या सहा दिवसात आढळलेले नवे रुग्ण कोरोनामुक्त झालेले रुग्ण आणि मृत्यू झालेले रुग्ण...

    तारीख । नवेरुग्ण । को-मुक्त | मृत्यू

    30/5-      108  -  124  - 02

    31/5-      114   -  272  - 01

    01/6-      110   - 270  - 05

    02/6 -     102  -   241 - 03

    03/6-        78 -   335 -  01

    04/6-        86  -  314 -  02 ----------------------------------------- एकूण -     598 -  1556 - 14

  • 04 Jun 2021 03:15 PM (IST)

    कल्याणच्या द्वारली गावात लसीकरणास सुरुवात

    कल्याण पूर्व ग्रामीण भागातील द्वारली गावात लसीकरणास सुरुवात झाली आहे. नगरसेवक कुणाल पाटील यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. कल्याण ग्रामीणमधील द्वारली गावात आजपासून लसीकरण केंद्र सुरु झाले आहे. ग्रामीण भागातील नागरीक लसीकरणास चांगला प्रतिसाद देत आहेत.

  • 04 Jun 2021 02:26 PM (IST)

    औरंगाबाद शहरातील बाजारपेठेत पुन्हा तुफान गर्दी

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद शहरातील बाजारपेठेत पुन्हा तुफान गर्दी

    पैठण गेट, औरंगपुरा, गुलमंडी परिसरात तुफान

    मोठ मोठ्या रस्त्यावर ट्रॅफिक जॅम

    अर्धा अर्धा तासापासून गर्दीत अडकली वाहने

    रस्त्यावर वाढणाऱ्या गर्दीमुळे पुन्हा कोरोनाचा धोका

  • 04 Jun 2021 10:48 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर ओसरला, पॉझिटिव्ह रुग्णसंख्या 990 वर

    यवतमाळ- यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा कहर ओसरला ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 990 नवीन पॉझिटिव्ह 81 2 जणांचा मृत्यू दोन महिन्यांपूर्वी ऍक्टिव्ह रुग्णाचा आकडा गेला होता 7 हजार पार आज ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह 990

  • 04 Jun 2021 09:53 AM (IST)

    बारामतीत लॉकडाऊनमुळे टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान, अवघ्या दीड-दोन रुपयाने विक्री

    बारामती : लॉकडाऊनमुळे टोमॅटो उत्पादकांचं मोठं नुकसान...

    - दिड ते दोन रुपये किलो दराने होतेय टोमॅटोची विक्री..

    - टोमॅटोचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी हैराण..

    - विषाणूजन्य रोगाचाही टोमॅटोवर परिणाम...

    - टोमॅटो उत्पादकांचं कोट्यावधी रुपयांचं झालंय नुकसान..

  • 04 Jun 2021 08:25 AM (IST)

    बुलडाण्यात कोरोनाबधित रुग्णाला 5 लाखांचे बिल, जास्तीचे बिल रुग्णाला परत करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    बुलडाणा

    लेखा परीक्षणात ही 7 कोव्हिडं रुग्णालयांची खेळी उघड, कोरोनाबधित रुग्णाकडून घेतले 5 लाखाचे जास्त बिल, लेख परिक्षकांनी केलेल्या परीक्षणात ही बाब झाली उघड,

    जिल्ह्यात कोव्हिडं परवानगी दिलेले 94 रुग्णालय आहेत, पैकी 7 रुग्णालयानी कोरोनाबधितकडून जास्तीचे बिल घेतले,

    जास्तीचे बिल घेतलेले रुग्णाला परत करण्याचे जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांचे आदेश,

  • 04 Jun 2021 07:57 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात म्युकरोमायकोसिसचा पेच कायम, केवळ 3596 इंजेक्शन उपलब्ध

    नाशिक - जिल्ह्यात म्युकरोमायकोसिसचा पेच कायम

    काल जिल्ह्याला मिळाले नाही एकही इंजेक्शन

    जिल्ह्यात सध्या म्युकर्माकोसिस चे 307 रुग्ण

    तर प्रशासनाकडे एमफोथरेसिन कबे फक्त 3596 इंजेक्शन उपलब्ध

    30700 ची गरज असताना प्रत्यक्षात मिळाले फक्त 3596 इंजेक्शन

    आरोग्य यंत्रणेसमोर नवीन आव्हान

  • 04 Jun 2021 07:56 AM (IST)

    नाशिक महापालिकेत बाल रुग्णालयांची तपासणी, बालरोग तज्ञांशी चर्चा करुन पुढील नियोजन

    नाशिक - महापालिका करणार बाल रुग्णालयांची तपासणी

    कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर करणार पाहणी

    औषध साठा, वैदकीय व्यवस्था आहेत की नाही याचा घेणार आढावा

    बालरोग तज्ञांशी चर्चा करुन महापालिका ठरवणार पुढील नियोजन

  • 04 Jun 2021 07:55 AM (IST)

    कोल्हापूरकरांना दिलासा, कोरोना मृत्यूदरात जिल्ह्याला काहीसा दिलासा, बाधितांची संख्या मात्र वाढतीच

    कोल्हापूर

    कोरोना मृत्यूदरात जिल्ह्याला काहीसा दिलासा

    तब्बल 40 दिवसानंतर झाले 30 पेक्षा कमी मृत्यू

    काल दिवसभरात 28 जणांचा कोरोनामूळे मृत्यू

    23 एप्रिल ते तीन जून या काळात 1853 जणांनी गमावला जीव

    बाधितांची संख्या मात्र अजूनही कायम

  • 04 Jun 2021 07:54 AM (IST)

    नाशिकमध्ये उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजन देण्यास परवानगी

    नाशिक - उद्योगांना 20 टक्के ऑक्सिजन देण्यास परवानगी

    ऑक्सिजनचा तुटवडा सहन करणाऱ्या उद्योगांना मोठा दिलासा

    रुग्ण वाढळयाने उद्योगांना होणार ऑक्सिजन पुरवठा 100 टक्के बंद करण्याचा घेण्यात आला होता निर्णय

    स्टील,फेब्रिकेशन कंपन्यांना यामुळे बसला होता मोठा फटका

    अनेकांनी कंपनी बंद करण्याचा घेतला होता निर्णय

    आयमा संघटनेने ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी केला पाठपुरावा

  • 04 Jun 2021 07:18 AM (IST)

    हेन्केल कंपनीचे महत्त्वपूर्ण पाऊल, तीन व्हेंटिलेटर मशीन आणि सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची मदत

    पुणे
    पुणे जिल्ह्यातील इंदापूर व दौंड येथील ग्रामीण रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर मशीन व सहा ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर हेन्केल कंपनीतर्फे भेट....
    सध्या कोरोनाने  सर्वच ठिकाणी थैमान मांडल आहे. आरोग्य यंञणा कमी पडते आहे.आँक्सिजन तुटवडा व्हेंटिलेटरची कमतरता, यासाठी हेन्केल कंपनीने महत्वाचे पाऊल उचलले आहे.
    पुणे जिल्ह्यात तीन व्हेंटिलेटर मशीन आणि सहा ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर दौंड व इंदापूर ग्रामीण रुग्णालयाला भेट
    रुग्णांना लवकरात लवकर उपचार व्हावा, यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचलत हेन्केल कंपनीने ग्रामीण रुग्णालयात भेट म्हणून दिले
  • 04 Jun 2021 06:47 AM (IST)

    विनापरवाना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर कारवाई, एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

    रत्नागिरी - कडक लॉकडाऊन मध्ये खासगी आरामबसवर खेड येथे कारवाई

    एक प्रवासी निघाला पॉझिटिव्ह

    विनापरवाना रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्सवर खेड पोलिसांनी केली कारवाई

    बसमधील 29 प्रवाशांची केली रॅपिड अँटिजेन टेस्ट : एक प्रवाशी पॉझिटिव्ह

    रत्नागिरी जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

  • 04 Jun 2021 06:44 AM (IST)

    सोलापुरात विडी कारखाने सुरु करण्यासाठी आंदोलन, एकाला कोरोनाची लागण

    सोलापूर - विडी कारखाने सुरू करण्याच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

    आंदोलन करणाऱ्या कामगारांना ताब्यात घेऊन पोलिसांनी केली होती रॅपिड अँटीजन टेस्ट

    अडीशे जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस मुख्यालयात केली रॅपिड ऍन्टीजन टेस्ट

    कोरोना  चाचणीत एकाचा अहवाल पॉझिटिव

    महापालिका प्रवेशद्वारासमोर विडी कामगारांनी विडी कारखाने सुरू करण्याच्या मागणीसाठी केले होते आंदोलन

  • 04 Jun 2021 06:43 AM (IST)

    सोलापूर महापालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा, अत्यावश्यक सेवेतील दुकाने 2 पर्यंत सुरु राहणार

    सोलापूर

    सोलापूर महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना मोठा दिलासा

    शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत राहणार सुरू

    तर अत्यावश्यक सेवेतील दुकानांना सोमवार ते शुक्रवारपर्यंत सकाळी 7 ते 2 पर्यंत परवनगी

    विशेष म्हणजे दुपारी 3 नंतर अत्यावश्यक कारण, वैद्यकीय कारण वगळता नागरिकांना संचार करण्यास बंदी

    यंत्रमाग, विडी, गारमेंट उद्योगांना देखील सकाळी 7 ते दुपारी 2 यावेळत परवानगी

    पालिकेला स्वतंत्र घटक म्हणून मान्यता मिळाल्याने आयुक्त पी. शिवशंकर यांचे आदेश

  • 04 Jun 2021 06:41 AM (IST)

    राज्यात काल 15,229 नवीन रुग्णांचे निदान, मृत्यूदर 1.68 टक्क्यांवर

    राज्यात काल 15,229 नवीन रुग्णांचे निदान

    राज्यात  काल 307 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

    त्यामुळे मृत्यूदर हा 1.68 टक्के एवढा झाला

    राज्यात काल 15,229 नवीन रुग्ण सापडल्यानंतर सद्यस्थितीत एकूण 2,04,974 सक्रिय रुग्ण

    राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 57,91,413 झाली

Published On - Jun 04,2021 9:32 PM

Follow us
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.