Maharashtra Coronavirus LIVE Update : पोलिसांची शिष्टाई, बंडातात्या कराडकरांचा पायी वारीचा निर्णय मागे

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 02 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

Maharashtra Coronavirus LIVE Update : पोलिसांची शिष्टाई, बंडातात्या कराडकरांचा पायी वारीचा निर्णय मागे
कोरोना

| Edited By: Nupur Chilkulwar

Jul 03, 2021 | 6:46 AM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 02 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 02 Jul 2021 11:29 PM (IST)

  लसीकरण केंद्रावर जाणाऱ्या शिक्षिकेचा खड्ड्यामुळे अपघात, उपचारांदरम्यान मृत्यू

  रस्त्यावरील खड्डा चुकवताना शिक्षिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. शिक्षिका आपल्या दिरासोबत लस घेण्यासाठी स्कूटरवरून जात असताना हा प्रकार घडला आहे.

  कल्याण पश्चिमेतील गांधारी परिसरात हाय प्रोफाईल रितू कॉम्प्लेक्स आहे. या कॉम्प्लेक्स मध्ये राहुल कटारिया आपल्या पत्नी दिव्या आणि कुटुंबियांसोबत राहतात. राहुल आणि दिव्या हो दोघे शिक्षक आहेत. दिव्या ही अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांना गणित शिकवत होती. 23 जूनला दिव्या हिला लस घ्यायची होते. ती तिचे दीर अर्जुन कटारियासोबत लस घेण्यासाठी जायला निघाली. मात्र त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या स्कूटरमध्ये पेट्रोल कमी आहे. अर्जुन कटारिया यांचे म्हणणे आहे की, ते आपल्या वहिनीला घेऊन पेट्रोल भरण्यासाठी बापगाव येथील पेट्रोल पंपावर जात असताना त्यांनी एका ट्रकला ओव्हरटेक केले. ते ट्रकच्या पुढे निघाले मात्र रस्त्यावर पाण्याने भरलेला खड्डा असल्याने अर्जुन यांची गाडी स्लिप झाली आणि या घटनेत दिव्या गंभीर जखमी झाली. तिच्यावर खासगी रुग्णालयात 4 दिवस उपचार सुरू होते. अखेर दिव्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अशी माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे.

 • 02 Jul 2021 09:53 PM (IST)

  मुबंई-पुणे दुर्तगती मार्गावर बोरघाटात कार व मल्टीवाहनाचा अपघात, तीन ठार

  मुबंई-पुणे दुर्तगती मार्गावर बोरघाटात कार व मल्टीवाहनाचा अपघात, तीन ठार

  कार मधील एकाच कुटुबांतील तीन जणांचा मृत्यू, तर अन्य काही जण जखमी.

  मृतांमध्ये बालकाचा समावेश.

  जखमींना कळंबोली येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 • 02 Jul 2021 09:36 PM (IST)

  सांगली कोरोना / म्युकर मायकोसिस अपडेट

  सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 944 कोरोना रुग्ण

  म्युकर मायकोसिसचे एकूण रुग्ण 293, आज सापडलेले नवे रुग्ण 3, आज मृत्यू 2

  जिल्ह्यात आज कोरोनामुळे 19 रुग्णाचा मृत्यू

  जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा आकडा 4108 वर

  अॅक्टिव्ह कोरोना रुग्णसंख्या 9703 वर

  तर उपचार घेणारे 849 जण आज कोरोनामुक्त

  आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 133976 वर

  जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 147787 वर

 • 02 Jul 2021 08:45 PM (IST)

  सातारा जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू

  सातारा : RT-PCR टेस्ट पॉझिटिव्हिटी निकषानुसार सातारा जिल्हाचा पुन्हा चौथ्या स्तरात प्रवेश

  जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा निर्णय

  अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकाने सकाळी 9 ते 2 या वेळेत राहणार सुरू

  मात्र अत्यावश्यक सेवा नसलेली सर्व दुकाने राहणार पूर्ण बंद

  हॉटेल रेस्टॉरंटसाठी सकाळी 9 ते 8 फक्त पार्सल सेवा राहणार सुरू, हॉटेलमध्ये बसण्यास केली मनाई

  शनिवार आणि रविवार पूर्ण संचारबंदी

  सर्व प्रकारची मेडिकल सेवा राहणार सुरू

  कृषी विषयक सर्व दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी

  सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी, विवाह सोहळ्यासाठी 25 जणांना परवानगी

  सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज रात्री 12 वाजल्यापासून आदेश जारी केले

 • 02 Jul 2021 08:30 PM (IST)

  पोलिसांची शिष्टाई, बंडातात्या कराडकरांचा पायी वारीचा निर्णय मागे

  ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर आळंदीत वारीत दाखल होते. तसेच यावेळी नियम डावलून पायवारीला सुरुवात करण्यात आली. बंडातात्या जिथे दिसतील तिथून त्यांना ताब्यात घ्या, असे आदेश देण्यात आले होते, असे असले तरी बंडातात्या हे वारीत सहभागी झाले होते. सर्व वारकऱ्यांनी आळंदी येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर आज ते स्वतः वारीत सहभागी झाले होते. मात्र पोलिसांच्या शिष्टाईनंतर बंडातात्या कराडकर यांनी पायी वारी करण्याचा निर्णय मागे घेतला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 • 02 Jul 2021 08:10 PM (IST)

  अकोल्यात कोरोना अपडेट

  अकोल्यात कोरोना अपडेट

  अकोल्यात आज दिवसभरात 8 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

  आतापर्यंत 1128 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56187 जणांनी कोरोनावर मात केली

  तर सध्या 239 रुग्ण उपचार घेत आहेत

  तर दिवसभरात 69 जण कोरोना मुक्त झाले आहेत

 • 02 Jul 2021 08:08 PM (IST)

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आजही कोरोनामुळे शून्य मृत्यू

  48 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 87 जणांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्ण संख्या - 477134

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 467885

  एकूण मृत्यू संख्या - 9025

 • 02 Jul 2021 07:18 PM (IST)

  कल्याण डोंबिवलीमध्ये उद्या 5 केंद्रावर लसीकरण

  कल्याण डोंबविवलीमध्ये 5 लसीकरण केंद्रापैकी 2 लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लसीची पहिला आणि दुसरा डोस आणि उर्वरित 3 लसीकरण केद्रांवर कोविशिल्ड लसीचा केवळ दुसरा डोस 18वर्षे व त्यावरील नागरिकांसाठी सकाळी 10.00 वाजल्यापासून लससाठा उपलब्ध असेपर्यंत देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यापैकी आर्ट गॅलरी, लालचौकी कल्याण (प.) येथे परदेशी जाणा-या नागरिकांसाठी‍ पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरा डोस आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केल्यावर देण्याची सोय केली आहे. आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती लसीकरण केद्रांवर जमा करुन घेतल्या जातील. ऑनलाईन स्लॉट आज रात्री 10.00 वाजता खुले होणार आहेत, असं प्रशासनाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.

 • 02 Jul 2021 06:03 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 286 रुग्णांची वाढ, 133 कोरोनामुक्त

  दिवसभरात २८६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १३३ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७. -२८५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७८८०३. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७०४. - एकूण मृत्यू -८५९४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६७५०५. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६४८४.

 • 02 Jul 2021 04:55 PM (IST)

  नागपुरात आज लहान मुलांच्या लसीची क्लिनिकल ट्रायल

  नागपुरात आज लहान मुलांच्या लसीची क्लिनिकल ट्रायल

  आज तिसऱ्या टप्प्यात 2 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना देण्यात आली लस

  14 मुलांवर झाली ट्रायल

  या आधी पहिल्या टप्प्यात 12 ते 18 दुसऱ्या टप्प्यात 6 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांन वर करण्यात आली ट्रायल

  आता पर्यंत चा ट्रायल चा निकाल आहे समाधान कारक

 • 02 Jul 2021 11:56 AM (IST)

  नागपुरात सलग चौथ्या दिवशी कोव्हीशील्ड अभावी लसीकरण बंद

  नागपूर ब्रेकिंग -

  नागपुरात आज ही लसीकरण बंद

  सलग चौथ्या दिवशी कोव्हीशील्ड अभावी  लसीकरण बंद

  फक्त तीन केंद्रावर दिली जात आहे co- vaccine लस

  इतर केंद्रावर लसीचा साठा सरकार कडून उपलब्ध झाला नसल्याने केंद्रांवर शुकशुकाट

  काही नागरिक येऊन जात आहे परत

 • 02 Jul 2021 09:31 AM (IST)

  सोलापूर शहरातील लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

  सोलापूर -

  शहरातील लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

  अठरा वर्षांपुढील सर्वांना कोवॅक्सिंन लस उपलब्ध

  पालिकेच्या 20 लसीकरण  केंद्रावर होणार लसीकरण

 • 02 Jul 2021 09:31 AM (IST)

  सोलापूर शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त

  सोलापूर -

  शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण जास्त

  24 तासात ग्रामीण भागात कोरोनाचे  486 नवे रुग्ण

  तर पाच जणांचा कोरोनाने मृत्यू

  पंढरपूर, माळशिरस, माढा माढा तालुक्यात बाधितांचे  प्रमाण जास्त

  तर शहरात कोरोना बाधित आढळण्याचे प्रमाण सरासरी 10 हुन कमी

 • 02 Jul 2021 09:21 AM (IST)

  सोलापूर जिल्ह्यात लसीचा पहिला डोस फक्त 18.7 टक्के नागरिकांना

  सोलापूर -

  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोठ्याप्रमाणात होणे आवश्यक असताना जिल्ह्यात लसीचा पहिला डोस फक्त 18.7 टक्के नागरिकांना

  जिल्ह्यातील एकूण 30 लाख 79 हजार 406 लसीकरणाच्या उद्दिष्टापैकी एक लाख 29 हजार 402 जणांना लसीचे  दोन्ही डोस मिळाले

  दोन्ही लसी पूर्ण झालेल्या नागरिकांचे  प्रमाण 4.20 टक्के

  तर 18 ते 44 वयोगटातील लसीकरण फक्त 2.4 टक्क्यावर

 • 02 Jul 2021 08:40 AM (IST)

  सोलापूर शहरातील लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

  सोलापूर -

  शहरातील लसीकरण केंद्रावर आज होणार लसीकरण

  अठरा वर्षांपुढील सर्वांना कोवॅक्सिंन लस उपलब्ध

  पालिकेच्या 20 लसीकरण  केंद्रावर होणार लसीकरण

 • 02 Jul 2021 08:39 AM (IST)

  प्रस्थान सोहळ्याला उपस्तिथीतीसाठी आरटीपीसीआर केलेल्या 368 पैकी 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण

  पुणे

  -प्रस्थान सोहळ्याला उपस्तिथीतीसाठी आरटीपीसीआर केलेल्या 368 पैकी 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण

  -आळंदी प्रस्थान सोहळ्यावर कोरोना चे संकट

  -काल 22 जणांना कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.त्यात आणखी 15 जणांची वाढ.

  -पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे यांची माहिती

 • 02 Jul 2021 07:47 AM (IST)

  संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर खबरदारी, नाशिक शहरातील निर्बंधांची कठोर अमंलबजावणी

  नाशिक -

  संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर खबरदारी

  शहरातील निर्बंधांची कठोर अमंलबजावणी

  पोलिसांकडून कारवाईचा धडाका

  संचारबंदी उल्लंघन करणाऱ्या 10 जणांना दंड

  विनामास्क फिरणार्याना 167 नागरिकांकडून 83 हजारांचा दंड वसूल

  तर वेळेचं उल्लंघन करणाऱ्या 4 दुकानांकडून 20 हजार दंड वसूल

 • 02 Jul 2021 07:46 AM (IST)

  औरंगाबाद, लातूर आणि नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची माहिती सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश

  औरंगाबाद -

  औरंगाबाद, लातूर आणि नाशिक येथील आरोग्य उपसंचालकांनी म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची माहिती सादर करण्याचे खंडपीठाचे आदेश..

  1 जून ते 28 जून दरम्यान म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची मागवली खंडपीठाने माहिती..

  उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण ,उपचारासाठी दिलेले इंजेक्शन आणि झालेले मृत्यू याचा मागितला आढावा

  शपथपत्रात जे निवेदन केले जाणार त्याला औरंगाबाद ,लातूर आणि नाशिक येथील उपसंचालकांना धरलं जाणार जबाबदार..

  सू-मोटो जनहित याचिकेवर सुनावणी दरम्यान मागवली माहिती..

 • 02 Jul 2021 07:18 AM (IST)

  नागपूर मनपा केंद्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

  नागपूर -

  मनपा केंद्रांमध्ये शुक्रवारी कोव्हीशिल्डचे लसीकरण नाही

  शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हीशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर आज कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही

  ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे

  तसेच ज्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनी कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतला आहे त्यांना दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज) व स्व.प्रभाकर दटके, म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे

  यासाठी ऑनलाईन नोंदणी आवश्यक आहे

 • 02 Jul 2021 07:08 AM (IST)

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

  उस्मानाबाद -

  कोरोनाच्या तिसऱ्या लाटेविरोधात लढण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज

  7 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पासह 3 लिक्विड टँकमधून दररोज 73.36 टन ऑक्सिजनची निर्मिती

 • 02 Jul 2021 06:54 AM (IST)

  नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी

  नालासोपारा -

  नालासोपाऱ्यात फेरीवाल्यांची दादागिरी समोर आली आली आहे. कोरोनाचे नियम तोडून,  हातगाडे लावून गर्दी करणाऱ्या फेरीवाल्यानी कारवाही करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या गाडी खाली जाऊनच आपला विरोध दर्शविला आहे.

  वसई विरार महापालिका हद्दीत कमी झालेली कोरोनालाची संख्या वाढत असल्याने , गर्दीच्या ठिकाणावर महापालिकेने कारवाRचा बडगा उगारला आहे.

  नालासोपारा पूर्व तुलिंज पोलीस ठाण्यासमोर सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत फेरीवाले तुफान गर्दी करत असतात

Published On - Jul 02,2021 6:35 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें