Corona | तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द

कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्राची (Corona Effect Tuljapur Temple Closed) कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे.

Corona | तुळजाभवानी देवीचे मंदिर दर्शनासाठी बंद, चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द
तुळजापूर मंदिर
Nupur Chilkulwar

|

Mar 16, 2020 | 1:44 PM

उस्मानाबाद : कोरोनाचा वाढता धोका पाहता महाराष्ट्राची (Corona Effect Tuljapur Temple Closed) कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तुळजाभवानी देवीची चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात (Corona Effect Tuljapur Temple Closed) आली आहे.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे 5 वाजल्यापासून मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे.

हेही वाचा : Corona | मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली, 5 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 38 वर

तुळजाभवानी मंदिर संस्थानने निर्णय जाहीर करताना देवीच्या धार्मिक पूजा आणि विधी हे देवीचे महंत आणि पाळीकर पुजारी हे करतील. मात्र, 4 पेक्षा जास्त पुजारी उपस्थित राहणार नाहीत, याची दक्षता घेतली आहे.

देवीची चरण तीर्थ, प्रक्षाळ पूजा आणि अभिषेक पूजा या भक्तांसाठी बंद असतील असे तहसीलदार तथा मंदिर व्यवस्थापक योगिता कोल्हे यांनी सांगितले. जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थांचे अध्यक्ष दिपा मुंडे मुधोळ यांचे पुढील आदेश येईपर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद असणार आहे.

तुळजाभवानी देवीची 5 एप्रिल ते 9 एप्रिल दरम्यान होणारी चैत्र पौर्णिमा यात्राही रद्द करण्यात आली आहे . तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आंध्रप्रदेशसह देशभरातील भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, कोरोनामुळे मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आल्याने भाविकांनी तुळजापूर येथे दर्शनासाठी येऊ नये, असे आवाहन (Corona Effect Tuljapur Temple Closed) मंदिर संस्थानच्या अध्यक्षा दिपा मुंडे यांनी केले आहे.

संबंधित बातम्या :

‘कोरोना’मुळे मृत्यू झालेल्या भारतातील पहिल्या रुग्णाच्या मुलीलाही लागण

‘कोरोना’विषयी अफवा पसरवणं अंगलट, पुण्यानंतर बीडमध्ये दोघांवर गुन्हा

Corona | ‘कोरोना’शी लढण्यासाठी महापालिका सज्ज, मुंबई-पुण्यात घरोघरी सर्वेक्षण

Corona | पुण्यात संचारबंदीचा प्रस्ताव, तुळशीबाग तीन दिवस बंद

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें