नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, दिवसभरात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient increase in Navi Mumbai) आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढताच, दिवसभरात 65 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

नवी मुंबई : नवी मुंबईत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत (Corona Patient increase in Navi Mumbai) आहे. काल (25 मे) दिवसभरात नवी मुंबईत 65 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा 1711 वर पोहोचला आहे. आतापर्यंत नवी मुंबईत 52 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका प्रशासनामध्ये चिेंतेचे वातावरण (Corona Patient increase in Navi Mumbai) आहे.

नवी मुंबईत आतापर्यंत 799 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एपीएमसी मार्केट आठवडाभर बंद करण्यात आले होते. सात दिवसातनंतर मार्केट उघडल्यानंतरही एपीएमसी मार्केटमध्ये कोरोना रुग्ण आढळत आहेत. गेल्या दोन दिवसात एपीएमसीमध्ये 14 कोरोना रुग्ण आढळले आहे. लागण झालेल्यांमध्ये एपीएमसीचे कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी आणि काही व्यापाऱ्यांचा समावेश आहे.

महापालिकेकडून एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी, माथाडी कामगार, परप्रांतीय कामगार आणि एपीएमसी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यामधून आतापर्यंत 584 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

विशेष म्हणजे, एपीएमसी मार्केटमध्ये6 23 मे रोजी धक्कादायक घटना समोर आली. दहा दिवसांपूर्वी कोरोनाबाधित भाजीपाला व्यापाऱ्याच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मुलाचाही कोरोनाने मृत्यू झाला. तसेच त्या व्यापाऱ्यालाही कोरोनाची लागण झाली आहे. ते व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे एपीएमसीमध्ये शोकाकुल वातावरण पसरले आहे. आतापर्यंत एपीएमसी प्रशासनाने केलेल्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यात आले आहे.

मुंबईत दररोज प्रवास करणारे शासकीय तसेच वैद्यकीय कर्मचारी, दीड महिना सुरू ठेवण्यात आलेली एपीएमसी बाजारपेठ, पालिका अधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव, अनुभवी डॉक्टरांची कमतरता अशा अनेक कारणांमुळे नवी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा हजाराच्यावर पोहोचला आहे, असं म्हटलं जात आहे. त्याचबरोबर एपीएमसीमुळे नवी मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात पसरत आहेत, असाही आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

एपीएमसीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात येत असून ही संख्या आटोक्यात येईल, असा विश्वास कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी व्यक्त केला आहे. मात्र मार्केटच्या प्रवेशद्वारावर हॉटस्पॉटमधून येणाऱ्या गाड्यांवर फवारणी केली जाते. पण ड्रायव्हर, क्लिनर आणि व्यापाऱ्यांची टेस्टिंग केली जात नाही. प्रवेशद्वारावर वैद्यकीय तपासणी केंद्र उभे करण्यात आले आहे. त्यामध्ये तपासणी करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही तसेच घरीच विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या दहा हजारांच्या घरात आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra Corona Update | राज्यात कोरोनाचं थैमान, आकडा 52 हजार 667 वर

नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण, कोरोना रुग्णांचा आकडा 1422 वर

नवी मुंबईत 1321 जण कोरोनाबाधित, सर्वाधिक 495 रुग्ण एपीएमसीतील, 9870 होम क्वारंटाईन

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *