मोठी बातमी | 15 जुलैपासून कोरोना लसीकरणाची महामोहीम! सलग 75 दिवस 18 वर्षांपुढील नागरिकांना बुस्टर डोस मोफत

संदीप राजगोळकर

संदीप राजगोळकर | Edited By: मंजिरी धर्माधिकारी, Tv9 मराठी

Updated on: Jul 13, 2022 | 4:34 PM

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने केंद्र सरकारतर्फे हा उपक्रम राबवला जात आहे.

मोठी बातमी | 15 जुलैपासून कोरोना लसीकरणाची महामोहीम! सलग 75 दिवस 18 वर्षांपुढील नागरिकांना  बुस्टर डोस मोफत
Image Credit source: tv9 marathi

नवी दिल्लीः कोरोनाविरोधात लढा देण्यासाठी केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली आहे. येत्या 15 जुलैपासून 75 दिवस कोरोना लसीकरणाची (Corona Vaccination) मोहीम राबवली जाईल. देशातील 18 वर्षांवरील नागरिकांना मोफत बुस्टर डोस (Free Booster Dose) दिला जाणार आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं भारतात केंद्र सरकारतर्फे (Central Government of India) अमृत महोत्सवी वर्ष साजरं केलं जात आहे. या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांचाच एक भाग म्हणून देशभरात ही मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे 18 वर्षांपुढील नागरिक, ज्यांनी कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेले आहेत, त्यांच्यासाठी बूस्टर डोस मोफत देण्याची व्यवस्था केंद्र सरकारतर्फे केली जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला.

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर काय म्हणाले?

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोनाच्या बुस्टर डोससंबंधीचा निर्णय घेण्यात आला. याची माहिती केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. ते म्हणाले, ‘ मार्च 2022 पासून कोरोना महामारी हा देशासमोरचा मोठा चिंतेचा विषय आहे. भारताने आतापर्यंत 199 कोटींपेक्षा जास्त कोरोना लसीकरण केले आहे. हा आकडा जवळपास 199 कोटी 60 हजार आतापर्यंत लसीकरण झाले आहे. आता 15 जुलै 2022 पासून पुढील 75 दिवसांपर्यंत 18पेक्षा जास्त वयच्या नागरिकांना बूस्टर डोस मोफत मिळेल. यामुळे नागरिकांना सुरक्षा मिळेल. आधी बूस्टर डोससाठी नागरिकांकडून शुल्क घेतले जात होते. यापूर्वी फ्रंटलाइन वर्कर्स, कोव्हिड वॉरिअर्स होते. किंवा 60 वर्षांपुढील नागरिकांसाठी हा बुस्टर डोस मोफत दिला जात होता. आता 18 वर्षांपुढील नागरिकांना हा मोफत दिला जाईल. सर्व सरकारी केंद्रांवर हा डोस उपलब्ध असेल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

प्रतिकार शक्ती आणखी वाढणार…

आयसीएमआर आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्रांच्या संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षानुसार, बुस्टर डोसद्वारे नागरिकांची कोरोना विरोधात लढण्याची क्षमता आणखी वाढेल. सुरुवातीला कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्यात अँटीबॉडीजचं प्रमाण कमी होऊ लागतं. बूस्टर डोस घेतल्याने प्रतिकारशक्ती वाढते. त्यामुळे देशातील 18 वर्षांपुढील नागरिकांसाठी मोफत बुस्टर देण्याचा मोठा निर्णय़ केंद्र सरकारतर्फे घेण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI