Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, दुधाच्या किंमतीत वाढ

नुकतंच दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित, कात्रज डेअरीमध्ये घेण्यात आली. त्यामध्ये हा निर्णय एकमताने घेण्यात आला.

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, दुधाच्या किंमतीत वाढ
milk price
Follow us
| Updated on: Mar 13, 2025 | 5:03 PM

सध्या महागाई गगनाला भिडली आहे. गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सध्या भाजीपाला, फळं यांचेही दर वाढताना दिसत आहे. त्यातच आता सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्यांना आता दूधासाठी 2 रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. कारण दूध उत्पादक संघाकडून गायीच्या आणि म्हशीच्या दूधाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे.

दूध उत्पादक आणि प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या सभासदांची बैठक बुधवार (१२ मार्च) रोजी घेण्यात आली. पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कात्रज डेअरीमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत दूधाच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार, गायीच्या दूधाच्या किंमतीत 2 रुपयांनी वाढ केली जाणार आहे. त्यामुळे गायीच्या दुधाची किंमत 56 वरून 58 रुपये इतकी केली जाणार आहे. तसेच म्हशीच्या दुधाच्या किंमतीतही २ रुपयांनी वाढ होणार आहे. त्यामुळे म्हशीच्या दुधाची किंमत 72 वरून 74 रुपये इतकी होणार आहे.

१५ मार्चपासून वाढीव दर लागू

दूध उत्पादक व प्रक्रिया कल्याणकारी संघाचे मानद सचिव प्रकाश कुतवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, २ रुपयांप्रमाणे दरवाढीचा निर्णय एक मताने झाला आहे. सध्याच्या महागाईच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे. हे वाढीव दर येत्या १५ मार्चपासून लागू करण्यात येणार आहेत.़

सध्याचे दर काय?

येत्या १५ मार्चपासून गायीच्या दूधाची किंमत ५४ ते ५६ रुपयांवरुन ५६ ते ५८ रुपये इतकी होणार आहे. तर म्हशीच्या दूधाची किंमत ७० ते ७२ रुपयांवरुन ७२ ते ७४ रुपये इतकी होणार आहे.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.