फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट

तसेच 2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15544 तर 2019 मध्ये 17517 गुन्हे नोंद झाले होते. | crime against women

फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला अत्याचाराच्या प्रमाणात घट
cm uddhav thackeray- devendra fadnavis

मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरुन विरोधकांच्या टीकेचे लक्ष्य झालेल्या महाविकासआघाडी सरकारच्यादृष्टीने (MahaviaksAghadi govt) एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. फडणवीस सरकारच्या तुलनेत महाविकासआघाडीच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचे (Crime) प्रमाण घटल्याचे आर्थिक पाहणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Crime rate against women decreases in Maharashtrta)

राज्यात सत्ता परिवर्तन होण्याआधी फडणवीस सरकारच्या काळात 2018 साली महिला अत्याचाराचे 35501 तर 2019 साली 37112 इतके गुन्हे नोंदवण्यात आले होते. महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर 2020 साली मात्र महिला अत्याचाराच्या प्रमाणात 10 हजारांपेक्षा जास्त संख्येने घट झाली असून महिला अत्याचाराच्या 26586 इतक्या गुन्ह्यांची झाली आहे.

तसेच 2018 मध्ये बालकांवरील अत्याचाराचे 15544 तर 2019 मध्ये 17517 गुन्हे नोंद झाले होते. 2020 साली मात्र बालकांवरील अत्याचाराचे हे प्रमाण तब्बल 6 हजारांनी घटून बालकांवरील अत्याचाराच्या 11154 गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

फडणवीस सरकारच्या काळात महिला व बालकांवरील अत्याचाराचा वाढता आलेख महाविकासआघाडी सरकारच्या काळात हजारोंच्या संख्येने घटल्याची बाब यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालात समोर आली आहे. गुन्हे अन्वेषण विभागाच्या आधारावर आर्थिक पाहणी अहवालात ही आकडेवारी सादर करण्यात आली आहे.

महाविकासआघाडी सरकारच्या कर्जमाफीचा लाभ किती शेतकऱ्यांना?

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 असं नाव कर्जमाफी योजनेला देण्यात आलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्यातील शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2019 पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या कर्जमाफीचा लाभ जानेवारी 2021 अखेर 31.04 लाख शेतकऱ्यांना झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात सादर केलेल्या आर्थिक पाहणी अहवालात देण्यात आली होती.

संबंधित बातम्या:

घरगुती वादातून अघोरी कृत्य, विधवा महिलेसह मुलींना मारहाण, एकीचा कान कापला

आधी प्रेमविवाह, आठ वर्षांचा मुलगाही, तरीही भल्या पहाटे क्षुल्लक कारणावरुन पतीची निर्घृण हत्या

मुलीचा आंतरजातीय प्रेमविवाह, अहमदनगरमध्ये भाजप तालुकाध्यक्षाचा जावयावर हल्ला

(Crime rate against women decreases in Maharashtrta)

Published On - 11:09 am, Tue, 9 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI