महिलेची गाडीतच प्रसुती, कर्जतमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप

जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जागतिक महिला दिनाच्या काही तास आधी महिलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

महिलेची गाडीतच प्रसुती, कर्जतमध्ये आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Mar 07, 2020 | 11:58 PM

अहमदनगर : जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात जागतिक महिला दिनाच्या काही तास आधी महिलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे (Delivery of Women in Ambulance in Karjat). कर्जतच्या सरकारी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालेल्या महिलेला रात्रभर उपचाराविनाच राहावं लागलं. तसेच ऐनवेळी अहमदनगरला पाठवण्यात आलं. मात्र, अहमदनगरला जात असताना प्रवासादरम्यानच तिची प्रसुती झाली. यात संबंधित महिलेला मोठ्या त्रासाला आणि गैरसोयीला सामोरं जावं लागलं. यानंतर महिलेच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर हलगर्जीपणाचा आरोप केला आहे.

संबंधित महिला 3 मार्चरोजी कर्जतच्या सरकारी रुग्णालयात दाखल झाली. मात्र, त्यानंतर रात्रभर या महिलेवर उपचारच केला नाही. त्यानंतर 4 मार्चला सकाळी बाळाच्या गळ्याला नाळ गुंडाळली आहे आणि त्यामुळे बाळाचा जीवाला धोका होऊ शकतो, असं म्हटलं. तसेच तात्काळ 108 क्रमांकावर कॉल करुन त्यांना अहमदनगरला हलवण्यास सांगितले. मात्र, जिल्हा रुग्णालयात जात असताना प्रवासादरम्यानच प्रसुती झाली. यात बाळ आणि आई सुखरुप आहे.

विशेष म्हणजे डॉक्टरांनी जे कारण सांगून संबंधित महिलेला जिल्ह्याला हवलण्याचा सल्ला दिला त्यातला काहीही प्रकार झाला नाही. महिलेची सामान्य प्रसुती झाली. त्यात बाळाच्या गळ्याला नाळ असल्याचं आढळलं नाही. यानंतर रुग्णाच्या कुटुंबीयांनी तालुका रुग्णालयातील डॉक्टरांवर भीती दाखवल्याचा आरोप केला आहे.

तालुका रुग्णालयातील डॉक्टरांनी तिच्यावर उपचार करण्यासाठी दवाखान्यात सोनोग्राफी मशिन नसल्यानं आणि महिला प्रसुती तज्ज्ञ नसल्यानं अहमदनगरला पाठवल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे कर्जत रुग्णालयात अनेकदा कारणं सांगून रुग्णांना भीती घातली जाते आणि जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवलं जात असल्याचाही आरोप नागरिकांमधून होत आहे.

विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्याचे आश्वासन देत राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी भाजपचे नेते राम शिंदे यांचा दारुण पराभव केला. मात्र, सध्या याच मतदारसंघातील कर्जतमध्ये आरोग्य व्यवस्थेवर आरोप होत आहेत. त्यामुळे आता तरी रोहित पवार याकडे लक्ष देणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

Delivery of Women in Ambulance in Karjat

Non Stop LIVE Update
अमरावतीच्या मैदानात चौरंगी लढत, नवनीत राणांविरोधात कडूंचा उमेदवार कोण?
अमरावतीच्या मैदानात चौरंगी लढत, नवनीत राणांविरोधात कडूंचा उमेदवार कोण?.
पवारांची मोठी खेळी?, साताऱ्यात पाटलांची माघार, पृथ्वीराज चव्हाण लढणार?
पवारांची मोठी खेळी?, साताऱ्यात पाटलांची माघार, पृथ्वीराज चव्हाण लढणार?.
शरद पवारांचे 'हे आहेत संभाव्य उमेदवार, जयंत पाटील यादी करणार जाहीर
शरद पवारांचे 'हे आहेत संभाव्य उमेदवार, जयंत पाटील यादी करणार जाहीर.
सुशीलकुमार शिंदे हिंदूंना दहशतवादी म्हटले होते, सातपुते यांची टीका
सुशीलकुमार शिंदे हिंदूंना दहशतवादी म्हटले होते, सातपुते यांची टीका.
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा
अजितदादांना मोठा धक्का, निलेश लंकेंचा आमदारकीचा राजीनामा.
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.