मोठी बातमी! एकनाथ शिंदे नाराज? महायुतीच्या गोटात वेगावान घडामोडी, थेट दिल्लीमध्ये…
राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज झाल्याची माहिती समोर आली असून, महायुतीच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे.

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला राज्यात मोठं यश मिळालं, भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला, तर शिवसेना शिंदे गट हा दुसऱ्या क्रमाकांचा पक्ष ठरला आहे. मात्र मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा फटका बसल्याचं पहायाला मिळत आहे. मुंबईमध्ये भाजपचे तब्बल 89 नगरसेवक निवडून आले तर शिवसेना शिंदे गटाला मात्र 29 नगरसेवकांवरच समाधान मानावं लागलं. दुसरीकडे मात्र शिवसेना शिंदे गटाच्या तुलनेत शिवसेना ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये चांगलं यश मिळालं. शिवसेना ठाकरे गटाचे मुंबईमध्ये 65 नगरसेवक निवडून आले. दरम्यान मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता महायुतीमध्ये नाराजी नाट्याला सुरुवात झाल्याची पहायला मिळत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा राज्य भाजपची तक्रार दिल्लीतील भाजपच्या हायकमांडकडे केली आहे.
शिवसेना शिंदे गटाला भाजपकडून अशा काही जागा देण्यात आल्या, जिथे मुस्लिम मतदारांची संख्या जास्त होती, भाजपला हे माहिती होतं, की या मतदारसंघात भाजपला मतदान होणार नाही, भाजपच्या उमेदवारांचा इथे पराभव होऊ शकतो, अशा जागा भाजपकडून शिवसेना शिंदे गटाला देण्यात आल्या, त्यामुळे मोठ्या संख्येनं शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा पराभव झाला, अशी शिवसेना शिंदे गटाची तक्रार आहे.
तसेच काही ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचं कामच केलं नाही, त्याचा देखील मोठा फटका हा मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाला बसला असा आरोप देखील शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत असल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे. सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार मुंबईतील 15 मतदारसंघात भाजपने युती धर्म पाळला नसल्यची तक्रार दिल्लीतील हायकमांडकडे करण्यात आली आहे. दरम्यान त्यामुळे आता हा वाद आणखी वाढण्याची शक्यात आहे.
मुंबईत महापौर कोणाचा?
मुंबईमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे, 89 नगरसेवक निवडून आले, मात्र तरी देखील पक्षाला पूर्ण बहुमत मिळालं नाही, भाजपला मुंबईमध्ये शिवसेना शिंदे गटाचा पांठिब्याची गरज आहे, त्यामुळे मुंबईत आता महापौर कोणाचा होणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
