कुणी मायचा लाल बहिणींचे पैसे परत घेऊ शकत नाही – अजित पवारांचा रवी राणांवर निशाणा

लाडकी बहीण योजनेबाबत सतत उलट सुलट चर्चा होत असतात. मात्र या योजनेबाबत बोलणाऱ्या, अपप्रचार करणाऱ्या विरोधकांना तसेच महायुतीतील काही नेत्यांनाही अजित पवार यांनी खडेबोल सुनावले आहेत.

कुणी मायचा लाल बहिणींचे पैसे परत घेऊ शकत नाही - अजित पवारांचा रवी राणांवर निशाणा
अजित पवारांनी रवी राणांवर साधला निशाणा
Follow us
| Updated on: Aug 16, 2024 | 9:28 AM

‘आमच्यातले महायुतीतले काही महाभाग पैसे परत घेऊ म्हणतात, पण कुणीही मायचा लाल बहिणींचे पैसे परत घेऊ शकत नाही ‘ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावलं आहे. रवि राणा यांनी ‘लाडकी बहीण’ योजेनवरील केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी हाँ निशाणा साधला आहे. जर तुम्ही महायुतीला आशिर्वाद दिला नाही. तर तुमच्याकडून 1500 रूपये काढून घेऊ, असं आमदार रवी राणा म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरून गेल्या काही दिवसांपासून राज्यात रणकंडन पेटले आहे. विरोधकांनी तर त्यांच्यावर आगपाखड केली आहेच, पण महायुतीतील अनेक नेत्यांनी सुद्धा त्यांना सुनावलं आहे. त्यातच आता अजित दादांनीही रवी राणांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करत निशाणा साधला.

काय म्हणाले अजित दादा ?

हडपसर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार बोलत होते. त्यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार करणाऱ्यांना सुनावलं.

‘माय माऊलींनो, कदाचित तुम्हाला कुणी सांगेल की बघा, त्यांना पैसे मिळाले, पण तुम्हाला मिळाले नाहीत. थोडा धीर धरा. आमच्यातले, महायुतीतले काही महाभाग असं वक्तव्य करतात की बघा हं, आम्ही पैसे देणार आहोत, तर मग तुम्ही आम्हाला नाही काही (मत) दिलं तर आम्ही (पैसे) परत घेऊ.

मी माझ्या माय-माऊलींना सांगतो, कुणी मायचा लाल तुमच्या अकाऊंटला गेलेला पैसा परत घेऊ शकत नाही. ‘ अशा शब्दांत अजित पवार यांनी राणांना टोला हाणला. हायुतीतील कोणीही अशा पद्धतीने चुकीचे वक्तव्य करू नये, चुकीला माफी नाही, असेही पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सुनावले.

रवी राणांच्या वक्तव्यावरून वाद

अमरावतीमध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’च्या प्रमाणपत्र वितरण सोहळ्यात आमदार रवी राणा यांनी जाहीरपणे वादग्रस्त विधान केलं होतं. या सोहळ्यात आगामी विधानसभा निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महिलांना इशारा दिला होता. ‘आम्ही तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे देतोय, तुम्ही आम्हाला मतरूपी आशीर्वाद दिले नाही तर हे पैसे परत घेऊ’, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं होतं. मात्र त्यांच्या या विधानांतर रण पेटलं होतं, विरोधकांनी राणा यांना धारेवर धरत त्यांच्या विधानावर टीकास्त्र सोडलं होतं. तसेच महायुतीतील नेत्यांनाही राणा यांचं वक्तव्य न रुचल्याने अनेक नेत्यांनी त्यांना सुनावलं होतं.

देवेंद्र फडणवीस यांनी सुनावलं 

यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणांना भरसभेत सुनावलं होतं. आमचे नेते गमतीगमतीत बोलताना काहीही बोलतात, कुणीतरी म्हणतं की लाडकी बहीण योजनेचे पैस परत घेऊ. पण अरे वेड्यांनो, या देशामध्ये भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली की त्याच्या बदल्यात केवळ माया आणि मायाच मिळत असते. निवडणुका येतात – जातात पण मला विश्वास आहे. बहिणींचा आशिर्वाद आमच्या पाठिशी असेल. जो पर्यंत आमचं त्रिमूर्तींचं सरकार सत्तेत आहे. तोवर बहिणींसाठीची ही योजना कुणाचा बापही बंद करू शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनीही राणांच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्यावर निशाणा साधला होता. माझी विनंती आहे. तू एका बहिणीचे पैसे परत घेऊन दाखव. मी चॅलेंज करते की, तुम्ही पैसे घेऊन दाखवा. मग बघा मी काय करते,’ असे सुप्रिया सुळे यांनी सुनावलं होतं. तसेच ‘डिसेंबरमध्ये लाडकी बहीणच्या लिस्टची स्क्रूटीनी होणार हे कोणाला माहिती होते का हो? मला तर ते माहिती नव्हते. मग यांना कसे कळले?”, असे प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केले.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.