AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: सीएम कार्यालयातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे विरोधकांची लिस्ट, हिटलिस्टवर दरेकर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात मुंबै बँकप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

VIDEO: सीएम कार्यालयातून मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे विरोधकांची लिस्ट, हिटलिस्टवर दरेकर, देवेंद्र फडणवीसांचा मोठा आरोप
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2022 | 1:04 PM
Share

मुंबई: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांच्याविरोधात मुंबै बँकप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर भाजप (bjp) आक्रमक झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी या मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. आम्ही मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून संजय पांडेंना आणलं आहे. त्यांच्याकडे सीएम कार्यालयातून एक यादी देण्यात आली आहे. या यादीच्या आधारे आम्ही विरोधकांवर कारवाई करणार आहोत. त्यात पहिलं नाव प्रवीण दरेकरांचं आहे, असं आम्हाल सत्ता पक्षातील लोकांनी सांगितलं आहे, असं सांगतानाच तुम्ही कितीही कारवाई केली तरी आम्ही भ्रष्टाचाराविरोधात बोलणं थांबवणार नाही. जो खड्डा खोदतो तोच या खड्ड्यात पडतो हे सरकारला सांगू इच्छितो, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला आहे.

प्रवीण दरेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र सुरू आहे हे मी काल सभागृहात सांगितलं होतं. मुंबई बँकेच्या संदर्भातील अहवाल तयार झाला. त्याचं अवलोकन केलं. त्यातील गडबड घोटाळ्यात सत्तापक्षातील लोकच पदाधिकारी आणि अध्यक्ष असल्याचं आढळून आलं आहे. दरेकर हे मजूर संवर्गातून निवडून आले सांगून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी मजूर संवर्गातून दरेकरांनी अर्ज भरला होता. तो मागे घेतला. त्यानंतर ते अर्बन बँक संवर्गातून अर्ज भरून निवडून आले. तरी जाणीवपूर्व गुन्हा दाखल केला आहे. मजूर फेडरेशनचा अध्यक्ष किंवा सदस्य असणं हा गुन्हा असेल तर या महाराष्ट्रातील 90 टक्के मजूर फेडरेशनचे सदस्य आणि अध्यक्ष हे विविध राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्या सर्वांवर कारवाई करा. आमची मागणी आहे. गुलाबराव देवकर हे सुद्धा मजूर फेडरेशनचे सदस्य होते. अनेक नावे आमच्याकडे आहेत. पण दरेकरांवर जाणीवपूर्वक कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते विरोधात बोलतात म्हणून कारवाई. दुर्देवाने मुख्यमंत्री याबाबतचा फॉलोअप घेत आहेत, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

मलिकांचा राजीनामा कधी घेणार?

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यावरही फडणवीस यांनी भाष्य केलं. कालपर्यंत तुम्ही सभागृहात सांगत होता. कोर्टात पीटीशन पेंडींग आहे. ईडीची कारवाई योग्य आहे हे कोर्टाने स्पष्ट केलं आहे. सरदार शहावली खान, सलीम पटेल यांच्याशी संगनमत करून मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. यात सहभागी असलेल्या मलिकांचा राजीनामा कधी घेणार? आता जर राजीनामा घेतला नाही तर हे सरकार दाऊदच्या दबावात काम करतंय हे स्पष्ट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

चर्चा कसल्या करता?

हे सरकार सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज कापत आहे. दोन्हीकडच्या आमदारांनी त्याबाबतचा एल्गार विधानसभेत केला. अजितदादांनी मागच्या अधिवेशनात घोषणा केली मे पर्यंत कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कापली जाणार नाही. अधिवेशनातील आश्वासन का पाळलं जात नाही? सुल्तानी पद्धतीने ठाकरे सरकार वीज का कापत आहे. त्यावर चर्चा करू म्हणून सांगितलं. पण आज या कोडग्या सरकारने वेगळीच चर्चा केली. सरकारला संवेदना नाही. चर्चा कसली करता वीज जोडण्या तोडण्याचं काम थांबवा. कनेक्शन जोडून द्या. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही प्रश्न लावून धरू, असा इशाराही त्यांनी दिला.

संबंधित बातम्या:

मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता

VIDEO | पक्ष, निवडणुका, आमदारकी गेली खड्ड्यात, ‘संभाजीनगर’साठी राजीनामाही देईन, मुनगंटीवारांची फुल्ल बॅटिंग

Maharashtra News Live Update : ठाकरे सरकार कोडगं सरकार – देवेंद्र फडणवीस

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.