ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, धनंजय मुंडेंचा दावा

बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर देण्यासाठी तब्बल 31 नवीन सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका आज दाखल झाल्या. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज या रुग्णवाहिकांचे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात लोकार्पण करण्यात आले. बीड जिल्ह्यात इतक्या संख्येने एकत्रित रुग्णवाहिका मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

ग्रामीण भागातील रुग्णांची रुग्णवाहिकेवाचून यापुढे हेळसांड होणार नाही, धनंजय मुंडेंचा दावा
धनंजय मुंडे यांच्या हस्ते 31 रुग्णवाहिकांचं लोकार्पण


बीड : ग्रामीण भागात रुग्णांना योग्य आरोग्य विषयक सुविधा व वेळेवर उपचार मिळावेत यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागास 31 रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गरज भासल्यास आणखी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. त्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची हेळसांड होणार नाही. याकडे पुढील काळात लक्ष केंद्रित केले जाईल, असं आश्वासन सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. (Dhananjay Munde inaugurates 31 ambulances to Beed ZP Health Department)

बीड जिल्हा परिषद आरोग्य विभागास विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांवर देण्यासाठी तब्बल 31 नवीन सर्व सुविधा युक्त रुग्णवाहिका आज दाखल झाल्या. धनंजय मुंडे यांच्या हस्ते आज या रुग्णवाहिकांचे जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या मैदानात लोकार्पण करण्यात आले. बीड जिल्ह्यात इतक्या संख्येने एकत्रित रुग्णवाहिका मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर जिल्हा रुग्णालयांतर्गत विविध उपजिल्हा रुग्णालय येथे देण्यासाठी आणखी 12 रुग्णवाहिका मंजूर आहेत. येत्या आठवडा भरात त्या 12 रुग्णवाहिका देखील जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती मुंडे यांनी दिलीय.

जिल्ह्यात 8 ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे

मुंडे यांच्या नेतृत्वात बीड जिल्हा आरोग्य विभागास या काळात बळकटी मिळत आहे. जिल्ह्यात काम सुरू असलेल्या पैकी 8 ऑक्सिजन प्लांट पूर्णत्वाकडे जात असून, याव्यतिरिक्त विविध आधुनिक सामग्री जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आहे. या लोकार्पण सोहळ्यास मुंडे यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्याताई सिरसाट, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे, माजी आमदार सुनील धांडे, माजी आमदार सय्यद सलीम, शिवाजी सिरसाट, जि प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रौफ शेख यांसह पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदी उपस्थित होते.

ऊसतोड कामगारांना मिळणार ओळखपत्र

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्यक्ष ऊसतोड कामगारांना देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांची नोंदणी ग्रामसेवकामार्फत करण्यात येणार आहे. तसंच त्यांना ओळखपत्र देण्याचा शासन निर्णय आज निर्गमित करण्यात आला आहे. कुठल्याही दस्त ऐवजात ‘ऊसतोड कामगार’ अशी नोंदणी नसलेल्या लाखो असंघटित ऊसतोड कामगारांच्या जीवनाशी निगडित धनंजय मुंडेंचं हे महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

इतर बातम्या :

राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल

‘3 सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा’, मनसे नेत्याचं मोठं विधान

Dhananjay Munde inaugurates 31 ambulances to Beed ZP Health Department

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI