AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, पुण्यातील डॉ. मनीषा सोनवणेंनी सर केले माऊंट किलीमांजारो

पुण्यातील डॉ. मनीषा सोनवणे यांनी 11 तारखेला आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले. या मोहिमेत महाराष्ट्राची पहिली महिला डॉक्टर बनण्याचा त्यांना मान मिळाला आहे.

आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखरावर फडकवला तिरंगा, पुण्यातील डॉ. मनीषा सोनवणेंनी सर केले माऊंट किलीमांजारो
DR MANISHA SONWANE
| Edited By: | Updated on: Sep 15, 2021 | 8:14 PM
Share

टांझानिया (आफ्रिका): 360 एक्सप्लोरर ग्रुपमार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यातील डॉ. मनीषा सोनवणे यांनी 11 तारखेला आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले. या मोहिमेत महाराष्ट्राची पहिली महिला डॉक्टर बनण्याचा त्यांना मान मिळाला आहे. त्यांनी आफ्रिकेतील टांजानिया या देशामध्ये असलेले “किलीमांजारो” हे शिखर सर करून एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. शिखरावर योगा करून त्यांनी योगाच्या प्रचार व प्रसारासाठी संदेशही दिला. (Dr Manisha Sonawane from pune climbed mount Kilimanjaro of Africa successfully)

नेहरू इन्स्टिट्यूट येथून गिर्यारोहणाचे धडे गिरवले 

पुण्याच्या मनीषा सोनवणे या डॉक्टर असून, किलीमांजारो शिखर सर करणाऱ्या त्या पहिल्याच मराठी महिला डॉक्टर ठरल्या आहेत. मनीषा सोनवणे यांनी नेहरू इन्स्टिट्यूट येथून गिर्यारोहणाचे धडे घेतलेले आहेत. हिमालय आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शिखर व गडकिल्ल्यांवर गिर्यारोहण करण्याचा त्यांना अनुभव आहे. शिखर सर केल्यानंतर डॉ. मनीषा सोनवणे यांनी शिखरावर योगा केला. तसेच डॉक्टर या नात्याने शरीराप्रती असलेली जागरूकता त्यांनी दाखवून दिली.

शिखराची उंची 19,341 फूट

किलीमांजारो हे टांझानिया देशातील शिखर असून याची उंची समुद्रसपाटी पासून 19,341 फूट आहे. प्रचंड अवघड आणि उंचीवर असलेले हे शिखर सर करण्याचं धाडस दाखवल्याबद्दल डॉ. मनीषा सोनवणे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून 360 एक्सप्लोरर मार्फत स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला.

संधी दिली तर महिला सगळं काही करुन दाखवतात

“आज महिला अगदी पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून काम करत आहेत. सर्वांनी जर त्यांच्यावर विश्वास दाखवला, त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिलं तर त्या काय करून दाखवू शकतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. 360 एक्सप्लोरर मार्फतनेहमीच स्त्री समानतेचा संदेश देण्यात आलेला आहे,” असे 360 एक्सप्लोररचे आनंद बनसोडे म्हणाले. आनंद बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 4 वर्षात अनेकांनी त्यांची स्वप्ने पूर्ण करत जगभरातील अनेक शिखरे सर केली आहेत.

शिखर सर झाल्याचा आनंद खूप मोठा

एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांची 360 एक्सप्लोरर हा भारतातील सर्वात टॉपचा ऍडव्हेंचर ऑर्गनायझर ग्रुप असून भारत सरकारमार्फत स्टार्ट-अप-इंडिया प्रमाणित आहे. अनेक विक्रम नावे असलेल्या 360 एक्सप्लोररद्वारे गिर्यारोहण क्षेत्रात अनेकांना ट्रेनिंग आणि त्याबरोबरच मार्गदर्शन सुद्धा दिले जाते. तर शेवटच्या चढाईत खूप त्रास झाला. पण शेवटी हे शिखर सर झाले, याचा खूप मोठा आनंद वाटत आहे. माझे पती डॉ. सतीश, दोन मुले, 360 एक्सप्लोररचे आनंद बनसोडे या सर्वांच्या मार्गदर्शनांमुळेच हे यश मिळाले आहे,” अशी प्रतिक्रिया डॉ. मनीषा सोनवणे यांनी दिली.

इतर बातम्या :

Video | पतीशी अनैतिक संबध असल्याचा संशय, महिलेची ऑफिसमध्ये जाऊन बहिणीला मारहाण

नोकरीच्या शोधात त्याच्या जीवनाचा अंत, डोंबिवलीच्या खंबालपाडा रोडवर रक्तबंबाळ अवस्थेत तरुण, उपचारादरम्यान मृत्यू

‘सरकारने आता तरी जागे व्हावे’, मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर खासदार संभाजीराजेंचं सरकारला आवाहन

(Dr Manisha Sonawane from pune climbed mount Kilimanjaro of Africa successfully)

ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?
ठाकरे बंधू-पवारांच्या NCPचा फॉर्म्युला ठरला! कोण किती जागांवर लढणार?.
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद
संभाजीनगरात युती फिस्कटली,जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये तीव्र मतभेद.
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ
ठाणे काँग्रेस कार्यालयात AB फॉर्म वाटपादरम्यान धक्काबुक्की अन् शिवीगाळ.
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?
मुंबईत शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचा आकडा फिक्स; किती जागांवर लढणार?.
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?
बेस्ट बसच्या धडकेत चौघांचा मृत्यू, 9 जखमी; भांडुपमध्ये घडलं काय?.
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी
वरळीत नाराजीनाट्य,आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची मध्यस्थी.
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?
नागपूरमध्ये शिवसेनेचे नेते नाराज अन् थेट गडकरींच्या भेटीला, कारण काय?.
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!
मनसे मुंबई पालिका निवडणूक 52 जागांवर लढवणार, उमेदवार ठरले!.
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात
कुलाब्यातून नार्वेकरांचे 3 नातेवाईक बीएमसी निवडणुकीच्या रिंगणात.
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार
नाशकात शिंदेंची सेना अन दादांची NCP एकत्र, भाजप स्वबळावर निवडणूक लढणार.