एकनाथ शिंदे यांचा पक्ष दोनचार महिन्यांपुरता, विधानसभेपर्यंत राहणार नाही; सर्वात मोठा दावा कुणाचा ?

मोदींकडे (असताना) विचार करायला काही संधी आहे का, यांना तरी कुणी विचारतं का ? मोदींकडे फक्त मोदी आणि अमित शाह यांचा विचार चालतो, बाकी कोणाचाही विचार चालत नाही अशा शब्दात ठाकरे गटाच्या नेत्याने टोला हाणला.

एकनाथ शिंदे यांचा पक्ष दोनचार महिन्यांपुरता, विधानसभेपर्यंत राहणार नाही; सर्वात मोठा दावा कुणाचा ?
एकनाथ शिंदे यांचा पक्ष दोनचार महिन्यांपुरता, विधानसभेपर्यंत राहणार नाही; सर्वात मोठा दावा कुणाचा ?
Follow us
| Updated on: Apr 04, 2024 | 3:37 PM

एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा फक्त दोन चार महिन्यांपुरता उरलाय. विधासभेच्या निवडणुका होईपर्यंत हा पक्ष राहील असं मला वाटत नाही असा दावा ठाकरे गटाचे नेते , विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. शिंदे गटाला आता घेरलेलंच आहे. हेमंत पाटील, भावना गवळींचं तिकीट कापलंय, हातकणंगलेमध्ये धैर्यशील मानेंना विरोध सुरू आहे. ठाणे, कल्याणही सहज मिळत नाहीये. रायगड मागण्याच्या प्रयत्नाहतही त्यांना अपयश आलं, असं सांगत विधानसभेपर्यंत शिंदेंचा पक्ष राहील असं मला वाटत नाही याचा पुनरुच्चार दानवेंनी केला.

लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवरच आलेल्या असताना महायुतीमधील जागा वाटप तिढा, धुसफूस पूर्णपणे थांबलेली नाही. भाजपने अनेक जागांवर त्यांचेच उमेदवार जाहीर करून शिंदे गट आणि अजित पवार गटाची गोची केली आहे. लोकसभेच्या जागा वाटपावरुन आता शिंदेंच्या शिवसेनेतच भाजप संदर्भात नाराजी सुरु झाल्याची माहिती आहे.

शिंदे गटातील अनेक मतदारसंघ भाजपने स्वत:कडे खेचल्यानं नाराजी आहे. निगेटिव्ह सर्व्हेचं कारण पुढे करत जागा स्वत:कडे घेतल्याची शिंदे गटातून तक्रारी आल्या होत्या. काही मतदारसंघ भाजपकडे गेल्यानं शिंदे गटात नाराजीचं वातावरण आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांचा पक्ष काही महिन्यांचाच सोबतीचा असल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला. विधानसभे पर्यंत हा पक्ष राहणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. भाजपच्या तालावरच शिंदे गटाला नाचावं लागतंय असेच त्यांनी अप्रत्यक्षरित्या सुनावले.

भाजपने शिंदे पवारांना ताटाखालचं मांजर बनवलंय

यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हेमंत पाटील यांची उमेदवारीही रद्द झाली. त्यानंतर हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यावरूनही शिवसेना उबाठा गटाकडून दानवेंनी टीकास्त्र सोडत खडे बोल सुनावलेत. ‘ भारतीय जनता पार्टी यांनी शिंदे आणि जे पवार आहेत यांना ताटाखालचं मांजर बनवून ठेवलं आहे’, अशी घणाघाती टीका दानवेंनी केली.

त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही, भारतीय जनता पार्टी जे म्हणेल तेच त्यांना करावं लागतं.पण एखाद्या पक्षाचा उमेदवार दुसऱ्या पक्षाने ठरवावा असं कधीच राज्यात झालं नाही. हे नवीनच होत आहे. जेव्हा शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे हे ज्यावेळी नेतृत्व करत होते त्यावेळेस आमचे उमेदवार बदलण्याची किंवा हा तुमचा उमेदवार असावा असं बोलण्याची भाजपची कधीच हिंमत झाली नाही. जागावाटप हे पक्षाचे होत असते, त्यांनी त्यांचा उमेदवार ठरवायला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका असते, परंतु हे भारतीय जनता पक्षाने ही नवीनच नीति अवलंबली आहे, अशी टीका दानवे यांनी केली.

महायुतीवर उमेदवार बदलण्याची वेळ 

महायुतीला यवतमाळ आणि हिंगोलीमध्ये उमेदवार बदलावा लागला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्याही काही जागा अजून फायनल झालेल्या नाहीत, याकडे कसं पाहता, असा प्रश्न दानवे यांना विचारण्यात आला. शिवसेनेच्या जवळपास सर्व जागा फायनल झाल्या आहेत. २१ उमेदवार पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. मुंबईतील काही विषय बाकी आहेत. काँग्रेस लढणार नसेल तर शिवसेना या जागा लढवणार अशा प्रकारची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे.

महायुतीत अजून घोळच चालू

राहता राहिला महायुतीचा प्रश्न तर त्यांचाच अजून घोळ सुरू आहे. त्यांचा उमेदवार बदलणं चालू आहे, याला जागा द्यायची का त्याला हेच अजून त्यांचं सुरू आहे. महायुती आहे की महाबेकी आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला. खरंतर तिकडेच बेकी आहे, आमच्याकडे सगळी एकी आहे असे सांगत अंबादास दानवेंनी महायुतीला टोला लगावला.

भाजपमध्ये मोदी आणि शाहांशिवाय कोणाचंच चालत नाही

विचारवंतांचा विचार फक्त नरेंद्र मोदींनी केलाय, नाटकबाजांचा विचार कुणी करत नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. त्यालाही दानवेंनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ मोदींकडे फार विचारवंत जमा झालेत’ उपरोधिक स्वरात उत्तर दिलं. मोदींकडे (असताना) विचार करायला काही संधी आहे का, यांना तरी कुणी विचारतं का ? असा खोचक सवालही दानवेंनी विचारला.

मोदींकडे फक्त मोदी आणि अमित शाह यांचा विचार चालतो, बाकी कोणाचाही विचार चालत नाही अशा शब्दांत दानवे यांनी अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदेंना टोला लगावला. गरिबी हटवण्यासाठी फक्त मोठमोठ्या घोषणा देतात बाकी काही नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...