AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एसंशिं, युटी आता ‘फुकटचा बाबुराव’ भर सभेत एकनाथ शिंदेंची तुफान टोलेबाजी, नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर "युटी" या शब्दाचा वापर करून जोरदार टीका केली आहे. "फुकटचा बाबुराव" असा टोला लगावून त्यांनी फेसबुक लाईव्हद्वारे बनावट बातम्या पसरवल्याचा आरोप केला.

एसंशिं, युटी आता 'फुकटचा बाबुराव' भर सभेत एकनाथ शिंदेंची तुफान टोलेबाजी, नेमकं काय म्हणाले?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 10, 2025 | 8:34 PM
Share

सध्या महाराष्ट्रात एसंशि आणि युबीटी या दोन शब्दांवरुन राजकारण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख करताना एसंशिं असा केला होता. तर दुसरीकडे यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रतिक्रिया देताना युटी असा उल्लेख केला होता. तुमचा शॉर्टफॉर्म युटी होतो म्हणजे युज अँड थ्रो म्हणायचं का असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला होता. या दोन शब्दांवरुन राजकारण रंगलेले असताना आता एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सांगोल्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह शिवसेना शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटीलही उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदेंनी जबरदस्त भाषण केले. या भाषणादरम्यान त्यांनी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. त्यांनी फेसबुक live करुन फेक नरेटीव पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत, असा टोला लगावला.

बापू मोकळा ढाकळा माणूस

सांगोल्याच्या लोकांचे प्रेम बघून एकदम ओके वाटत आहे. शहाजीबापू पडले असले तरी लोकांचे तुमच्यावर प्रेम आहे. एखाद्या मॅचमध्ये हरले म्हणून विराटची बॅट थंड पडत नाही. टायगर अभी जिंदा है. बापूंना मोकळे सोडणार नाही. बापू मोकळा ढाकळा माणूस आहे. आम्ही उठाव केला तेव्हा सारेजण तणावात होते, पण बापू विनोद करुन वातावरण तणावमुक्त करायचे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

काय झाडी या डायलॉगमुळे तर आसामचे पर्यटन खूप वाढले आहे. आता तर बिल्डर देखील त्यांच्या जाहिरातीत बापूचा डायलॉग टाकताना दिसत आहेत. बापूंना हे माहीत नसावे नाहीतर रॉयल्टी मागितली असती, असेही एकनाथ शिंदेंनी म्हटले.

“ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव”

“खुर्च्या बदलल्या तरी दिल बदलले नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. आम्ही जे बोललो ते सर्व देणार आहोत. फक्त थोडी थोडी परिस्थिती सुधारु द्या. कर्जमाफी असो किंवा काही घोषणा, त्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार आहोत. आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार नाही. त्यांनी फेसबुक live करुन फेक नरेटीव पसरवले. ते FB म्हणजे फुकटचा बाबुराव आहेत, असा टोला एकनाथ शिंदें यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. मी देखील FB म्हणजे फेवरेट भाऊ आहे”, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.