AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…अन् एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं, दिल्लीत नेमकं काय घडलं?

आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव' पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी हा प्रसंग घडला आहे.

...अन् एकनाथ शिंदेंच्या 'त्या' कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राचं मन जिंकलं, दिल्लीत नेमकं काय घडलं?
| Updated on: Feb 11, 2025 | 8:11 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदनात पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम सुरू असताना एक घटना घडली, एकनाथ शिंदे यांनी आपल्या एका कृतीनं अख्ख्या महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत.

नेमंक काय घडलं? 

एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र सदनात या क्रार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. दरम्यान या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीतानं झाली.  शामिमा अख्तर यांनी महाराष्ट्र गीत गायलं. शामिमा अख्तर जेव्हा महाराष्ट्र गीत गात होत्या तेव्हा सर्वजण खालीच बसले होते. मात्र ही गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या लक्षात येताच ते स्वत: उभे राहिले अन् त्यांनी इतरांना देखील उभं राहिला सांगितलं.

एकनाथ शिंदे, शरद पवार एकाच व्यासपीठावर

एकनाथ शिंदे यांना ‘महादजी शिंदे राष्ट्र गौरव’ पुरस्कार देण्यात आलं, यावेळी एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालं. शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना प्रदान करण्यात आला. विधानसभा निवडणुकीदरम्यान आणि त्यानंतर देखील विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये अनेकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे आज एकाच मंचावर आले.

दरम्यान यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ‘महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार सोहळा आज पार पडत आहे. दिल्लीच तख्त राखणाऱ्या महादजी शिंदे यांच्या स्मृतीला वंदन करतो. या सन्मानापेक्षा येणारी जबाबदारी मोठी आहे, शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार मिळणे हे भाग्य आहे. महादजी शिंदे यांच्या या महापराक्रमी भूमीत माझा देखील जन्म झाला हे माझं भाग्य. मला पुरस्कार देणारे जरी शरद पवार असले तरी ते देशाचे क्रिकेटपटू शिंदे यांचे जावई आहेत. कधी कधी बाजूला बसलेल्या लोकांना ते गुगली टाकतात, पण माझ्यावर आजपर्यंत शरद पवार यांनी कधी गुगली टाकली नाही, टाकणार नाही असं वाटत’ असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
Vijay Thalapathy | थलपती विजय यांचं सरकार पाडण्याचा कट? 15 आमदारांना कोट्यवधींचं आमिष!
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान
मुंबई हळहळली! महिला ट्रेनखाली चिरडली गेली अगदी... धो धो पावसादरम्यान धक्कादायक घटना
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे
पावसाचा कहर! पहिल्या आठवड्यातच झाले नागरिकांचे हाल! प्रभादेवी रेल्वे स्थानकाबाहेर थेट...
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा
एकच खळबळ! शिंदे सेनेत प्रवेशानंतर बंडखोर खासदाराचा थेट पोलखोल करण्याचा इशारा; तुमच्या नसानसात...
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील
पुन्हा 'मविआ'मध्ये मिठाचा खडा पडणार? शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील बडा नेता हे काय बोलून गेला? थेट मुख्यमंत्री...
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट
Latest Rain Update | प्रवाशांनो काळजी घ्या! मुंबई लोकल मंदावली; थेट रेल्वे रुळावरच... पहा व्हिडीओ
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!