AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता पहिल्यांदाच भाजपवर वार, म्हणाले, शहाजी बापू काही मित्र पक्षांनी तुमचा घात…

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, सांगोल्यातील प्रचार सभेत बोलताना पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे, यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता पहिल्यांदाच भाजपवर वार, म्हणाले, शहाजी बापू काही मित्र पक्षांनी तुमचा घात...
एकनाथ शिंदे Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2025 | 5:04 PM
Share

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, प्रचाराला देखील वेग आला आहे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे नेते शहाजी बापू पाटील यांनी भाजपमध्ये सुरू असलेल्या इनकमिंगवरून नाराजी व्यक्त केली होती, दुखत असताना, डॉक्टरने ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला असताना देखील आपण लोकसभेमध्ये भाजपचा प्रचार केला असं शहजी बापू  पाटील यांनी म्हटलं होतं. दरम्यान आज शहाजी बापू पाटील यांच्या मतदार संघात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडली, या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी नाव न घेतला पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तसेच आपण शहाजी बापू पाटील यांच्या पाठिशी उभे आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे? 

शहाजी बापू हे सांगोल्याचे जखमी शेर आहेत, जनतेच्या मनात चीड आणि आग आहे, त्यामुळे या मतदारसंघात सगळेच मतदानासाठी बाहेर पडले तर विजय आपलाच आहे.  शहाजी बापूमुळे सांगोल्याचा विकास झाला आहे,  बापू स्वतःचे काम कधी घेऊन आले नाहीत,  ते नेहमी या भागतील विकास कामंच माझ्याकडे घेऊन यायचे, विधानसभा निवडणुकीच्या काळात पुतळ्यासाठी मी विमानात बसायच्या आधी 50 लाखांचा निधी दिला होता. जीवाशी खेळून बापुंनी लोकसभेत आपल्या मतदारसंघात भाजपला लीड दिलं होतं. बापू तुम्हाला जर वाटत असेल की आमच्या मित्र पक्षांनी तुमचा गेम केला आहे, तर मी तुमच्या पाठिशी उभा आहे, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, बापू खूप हळवे आहेत. सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजित नही, उत्तम जानकर यांनीही खूप काही सांगितले आहे,  बापू आता उत्तम जानकर आणि तुम्ही दोघे मिळून पुढे  जा.  काय झाडी, काय डोंगरने आमचे बापू सेलिब्रेटी झाले. बापूला एकदा फसवले आता बापूला कोणी फसवू शकत नाही, हीच जनता आता विरोधकांना त्यांनी जाग दाखवेल, असं यावेळी शिंदे यांनी म्हटलं.

दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.