खवड्या डोंगरावरुन उडी मारणाऱ्या कुणाल आणि त्याच्या आईचा व्हिडीओ व्हायरल, आईचे पाय धुवून..
19 वर्षीय कुणाल चांदगुडे यांच्या एका निर्णयाने कुटुंब संपले. मुलाला वाचवण्यात वडीलही दरीत कोसळले, त्यानंतर आईनेही उडी घेतली. याबाबत विविध गोष्टी पुढे येताना दिसत आहेत. यामध्ये कुणाल आणि त्याच्या आईचा व्हिडीओ पुढे आला.
छत्रपती संभाजीनगर येथे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला. मुलाने हट्ट करून आयफोन 15 घेतला. त्यानंतर या फोनचे हप्ते फेडण्यावरून त्याचा वडिलांसोबत वाद झाला. मग काय पोरगा जीव द्यायला डोंगरावर केला. कुणाल चांदगुडे हा अभ्यासात हुशार होता. मात्र, एका हट्ट्याने कुटुंब संपले. खवड्या डोंगरावर कुणाल जीव द्यायला गेला. कुणालला वाचवण्यासाठी वडील मुरलीधर चांदगुडे पुढे गेले आणि दोघेही खाली कोसळले. हे बघताच आईनेही कोणता विचार न करता थेट उडी घेतली. एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियवर व्हायरल होत आहे. उपस्थित लोक या मुलाला समजून सांगताना दिसले. आईने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. पण कुणालने कोणाचेही ऐकले नाही. आता कुणाल याचा त्याच्या आईसोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या आईचे पाय धुताना दिसतोय. ताटात आईचे पाय ठेऊन त्याने धुतले. हा व्हिडीओ पाहून सर्वांकडून हळहळ व्यक्त केली जातंय.
