मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकात सरकते जिने, शेलू स्थानकात लिफ्ट, आणखी काय सुविधा ?
मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम, परवडणारी आणि ग्राहक केंद्रीय उपाय योजना राबविण्यात कायम आघाडीवर राहिली आहे आणि ग्राहक आणि प्रवाशांचा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी अनेक उपक्रम आणि उपाययोजना मध्य रेल्वेने राबविल्या आहेत.

पूर्वी केवळ विमानतळ आणि मॉलमध्ये दिसणारे सरकते जिने आता सगळीकडे दिसू लागले आहे. मध्य रेल्वेवर तर सरकते जिने आणि लिफ्टची अनेक वर्षांपासून सुरु आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयी आणि सुविधेसाठी अनेक उपक्रम सुरु केले आहेत. आता मध्य रेल्वेने उपनगरीय मार्गावर कर्जत रेल्वे स्थानकावर कल्याण दिशेकडील फुटओव्हर ब्रिजवर दोन सकरते जिने बसवले आहेत. तर शेलु स्थानकाच्या कर्जत दिशेला ज्येष्ठ नागरिकांसाठी एक लिफ्ट देखील उभारण्यात आली आहे. सरकते जिने आणि लिफ्टचा वापर ज्येष्ठ नागरिक आणि महिला तसेच लहान मुलांना करता येणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आणखीन काय सुविधा ?
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी सँडहर्स्ट रेल्वे स्थानकावर चार नवीन GPS clocks बसविण्यात आली आहेत.जुन्या उपनगरीय इंडिकेटर्सना बदलण्यात आले आहे. आणि नवीन अधिक चांगली इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत. घणसोली, रबाळे आणि ऐरोली स्थानकात अधिक चांगली दिसणारी इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत. उल्हासनगर, वांगणी आणि नेरुळ स्थानकांत ऑल इन वन व्हिडीओ डिस्प्ले इंडिकेटर्स बसविण्यात आली आहेत.
दिव्यांगासाठी सुविधा
मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमधील ८६ स्थानकांवर ५७५ एटीव्हीएम (Automatic Ticket Vending Machines) बसविण्यात आली आहेत. दिव्यांग प्रवाशांच्या सेवेसाठी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर एकूण १७० बझर बसविण्यात आले आहेत. मध्य रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कार्यक्षम, परवडणारी आणि ग्राहक-केंद्रित वाहतूक उपाय प्रदान करण्यात नेहमीच आघाडीवर राहिली आहे आणि ग्राहक आणि प्रवाशांचा प्रवास आनंददायी बनवण्यासाठी अनेक उपक्रम आणि उपाययोजना मध्य रेल्वेने राबविल्या आहेत.
