AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाणांनी मानले मनोज जरांगेंचे आभार; म्हणाले, त्यांच्यामुळे…

Ashok Chavan on Manoj Jarange Patil : भाजप नेते अशोक चव्हाण यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. अशोक चव्हाण यांनी का मानलेत जरांगेंचे आभार? मराठा आरक्षणावर आणि जरांगेच्या आंदोलनावर अशोक चव्हाण काय म्हणाले? वाचा सविस्तर बातमी...

अशोक चव्हाणांनी मानले मनोज जरांगेंचे आभार; म्हणाले, त्यांच्यामुळे...
अशोक चव्हाण, मनोज जरांगे पाटील
| Updated on: Jul 06, 2024 | 7:40 PM
Share

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मराठवाडा दौरा आणि संवाद रॅलीला आजपासून सुरुवात झाली. हिंगोलीतून ही रॅली सुरु झाली आहे. यावर बोलताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण म्हणाले यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आभार मानले आहेत. मनोज जरांगे पाटलांच्या रॅलीला सर्व स्तरातून पाठिंबा आहे. माझा व्यक्तिशः त्यांच्या प्रयत्नांना, त्यांच्या कष्टांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला. त्यांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा आहेत. हैदराबाद गॅजेटचा उपयोग होऊ शकतो का? यावरही चर्चा सुरू आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.

ओबीसी आरक्षणाबाबत काय म्हणाले?

ओबीसी समाजाचा नुकसान होऊ नये, ही सुद्धा आमची भूमिका आहे. आमचा प्रयत्न आहे की दोन्ही समाजामध्ये समन्वयाचा आणि चांगलं वातावरण राहो. त्यांचे आरक्षण सुरक्षित राहावं आणि मराठा समाजाला आरक्षण भेटावं अशी आमची भूमिका आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

शिंदे सरकारच्या योजनांवर भाष्य

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत अंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज देणाची घोषणा केली आहे. गाव तिथे गोदाम या योजनेच्या पहिल्या टप्प्यात शंभर नवीन गोदाम, त्या मूळे शेतमाल योजनेचा लाभ अधिक शेतकऱ्यांना पोहोचणार आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत पाच हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतले आहे, दोन वर्षात 61 प्रकल्प पूर्ण होणार आहेत. 3 लाख 65 हजार हेक्टर वर अपेक्षित सिंचन योजना वाढणार आहे 155  कॅनाल दुरुस्तीचा प्रस्ताव शासनाने घेतला आहे,  असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने शुभारंभ चांगला झाला आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत. 10 लाख युवकांना कामगार प्रशिक्षण व दहा हजार रुपये विद्यावेतन हा निर्णय घेण्यात आला आहे. 1 लाख लोकसंख्येच्या मागे 84 डॉक्टर एवढे प्रमाण आहे. हे प्रमाण 2035 पर्यंत 100 वर वाढवण्यासाठी 100 नवीन रुग्णालय मान्यता देण्यात आले आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत विम्याची रक्कम 5 लाख प्रति कुटुंब करण्यात आली आहे. वारकऱ्यांच्या बाबतीत प्रत्येक दिंडीला 20 हजार रुपयांचा अनुदान देण्यात येईल, असंही अशोक चव्हाण म्हणाले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.