Wardha Corona | कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

कोरोनाच्या संशयाने कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले.

Wardha Corona | कोरोनाचा संशय, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबाचा नकार, 3 तास मृतदेह पडून, प्रशासनाकडून अंत्यसंस्कार

वर्धा : समुद्रपूर तालुक्याच्या जाम येथील एका (Family Denied To Take Dead-Body) व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याचा स्वॅब घेणे आणि शवचिच्छेदन करण्यावरुन बराच काळ गदारोळ झाला. अखेर जिल्हा शल्यचिकित्सकांनी याप्रकरणी मध्यस्थी केली आणि मृतदेहाचे समुद्रपूरच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करुन त्याचे स्वॅब घेण्यात आले (Family Denied To Take Dead-Body). यातही कोरोनाच्या संशयाने कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने अखेर प्रशासनालाच अंत्यसंस्कार करावे लागले.

जाम येथील 47 वर्ष वय असलेल्या व्यक्तीला दहा दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप असल्याने तो घरीच होता. हा व्यक्ती चालक असल्याने त्याचे अनेक ठिकाणी जाणे येणे सुरु होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याची लक्षणं कोरोनाची असल्याने त्याची कोरोना चाचणी करुन अहवाल येईपर्यंत त्याचा मृतदेह शीतपेटीत ठेवायचा होता.

जामचे सरपंच सचिन गावडे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील भगत यांना माहिती देऊन रुग्णवाहिका बोलावली. मात्र, पीपीई किट नसल्याने त्याला रुग्णवाहिकेत टाकायचे कुणी हा प्रश्न निर्माण झाला होता. आरोग्य विभागाचा कोणी कर्मचारी मृतदेहाला हात लावत नसल्याने गावकऱ्यांसमोर अडचण निर्माण झाली होती (Family Denied To Take Dead-Body).

मृतदेह समुद्रपुरात न्यावा की हिंगणघाटला यावरुन दोन्ही वैद्यकीय अधीक्षकांचे एकमत नसल्याने नागरिकांची फरफट झाली.

जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सूचनेवरुन समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणून त्याचा स्वॅब घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर व्यक्ती कोरोना संशयित असल्याने मृताच्या नातलगांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने प्रभारी तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी यांनी निर्णय घेत प्रशासनाच्या वतीने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले (Family Denied To Take Dead-Body).

संबंधित बातम्या :

बायकोची आत्महत्या, अंत्यसंस्कारावेळी नवऱ्याचीही चितेत उडी, वाचवलेल्या नवऱ्याने पुन्हा विहिरीत जीव दिला

कुटुंब नाकारतं…पुण्यातील कोरोनोबळींवर करतात ‘ते’ अंत्यसंस्कार!

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *