AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महावितरणचा शॉक : शेतकऱ्यांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन, राज्यभरात कारवाई अन् आंदोलनाचे सत्र सुरुच

वीजपुरवठा खंडीत करताना शेतकऱ्यांना पूर्वसूचना देणे हा नियम असतनाही थेट वीजपूरवठाच खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या कारभारामुळे त्रस्त असलेल्या सय्यद पिंप्री येथील शेतकऱ्यांनी थेट उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढूनच 'शोले स्टाईल' आंदोलन केले आहे.

महावितरणचा शॉक : शेतकऱ्यांचे 'शोले स्टाईल' आंदोलन, राज्यभरात कारवाई अन् आंदोलनाचे सत्र सुरुच
विद्युत पुरवठा खंडीत केल्याने नाशिक जिल्ह्यातील सय्यद पिंप्री येथील शेतकऱ्यांनी टॉवरवर चढून आंदोलन केले.
| Edited By: | Updated on: Jan 30, 2022 | 1:05 PM
Share

नाशिक : आता कुठे वातावरण निवळले असून (Rabi Season) रब्बी हंगामातील पीके पाण्याला आली आहेत तर राज्यभर कांदा लागवडीची लगबग सुरु आहे. अगोदरच बळीराजा हा आस्मानी संकटाने मेटाकूटीला आला असताना हे कमी म्हणून की काय, लागलीच महावितरणेने (Power supply interrupted) वीजपुरवठा खंडीत करण्याचा ‘शॉक’ दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका ही सुरु आहे. एवढेच नाही तर वीजपुरवठा खंडीत करताना शेतकऱ्यांना पूर्वसूचना देणे हा नियम असतनाही थेट वीजपूरवठाच खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या कारभारामुळे त्रस्त असलेल्या सय्यद पिंप्री येथील (Farmer) शेतकऱ्यांनी थेट उच्च दाब वाहिनीच्या टॉवरवर चढूनच ‘शोले स्टाईल’ आंदोलन केले आहे. राज्यात सर्वत्रच अशा प्रकारे विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे तर नुकसान होतच आहे पण जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न उपस्थित होत आहे. यंदा पाणी असूनही त्याचा उपयोग करता येत नाही अशी अवस्था झाली आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनात घट झाली आहे. अशा परस्थितीमध्ये शेतकऱ्यांना मदत न करता अडचणीत वाढ केल्या जात आहेत.

शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन

ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कोंडीत पकडण्याचे काम हे ठरलेलेच आहे. आतापर्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. यंदा मूलबक प्रमाणात पाणी असतानाही केवळ महावितरणने केलेल्या कारवाईमुळे पिकांचे नुकसान होत आहे. शिवाय वीजबिल अदा करण्यासाठी शेतकऱ्यांना मुदतच देण्यात आली नाही. थेट कारवाई केल्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान होत आहे. त्यामुळेच शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले होते. खंडीत केलेला विद्युत पूरवठा पुन्हा सुरळीत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकरी अडचणीत असताना त्यांना मदत होणे गरजेचे आहे. येथे मात्र, आस्मानी संकटानंतर लागलीच सुलतानी संकट उभे केले जात असल्याचा आरोप शेतकरी संघटनेच्यावतीने केला आहे.

राज्यभरात कारवाई सुरुच

रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी वीजपुरवठा हा गरजेचाच आहे. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच त्यांना कोंडीत पकडण्याचा डाव महावितरणकडून दरवर्षी केला जातो. या माध्यमातून थोडीफार वसुली होत असली तरी यंदाची स्थिती ही निराळी आहे. वातावरणातील बदलामुळे यापूर्वीच पिकांचे नुकसान झालेले आहे. शिवाय यंदा मूबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ महावितरणच्या धोरणामुळे डोळ्यादेखत रब्बी हंगामातील पिके ही माना टाकत आहेत. राज्यभर ही कारवाई सुरु आहे. विद्युत पूरवठा सुरळीत करण्यासाठी एका कृषीपंपासाठी 5 हजार रुपये अदा करण्याची मागणी होत आहे.

संबंधित बातम्या :

Cotton : शेतकऱ्यांना मिळाला पांढऱ्या सोन्याचा आधार, आता केवळ फरदड शिल्लक, जाणून घ्या कसा राहिला हंगाम!

स्वप्न सत्यामध्ये : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता, 1 किलोमीटरला 24 लाख रुपये

द्राक्षाचे दर ठरले अन् मोडले, आता पपईच्या निर्णयाचे काय होणार? व्यापाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष..!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.