लय भारी… शेतकर्याची पीएसआय मुलगी ठरली ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेची ‘फर्स्ट रनर अप’
लय भारी... शेतकर्याची पीएसआय मुलगी ठरली ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेची ‘फर्स्ट रनर अप’ (Farmer's PSI daughter becomes 'first runner up' of 'Glamon Miss India')

जालना : शेतकर्याच्या मुलीने आयएएस, आयपीएस अधिकारी अशा उच्च पदांवर झेप घेण्याची किमया याआधी केली आहे. आता त्याही पुढे जाऊन शेतकर्याच्या सुकन्येने चक्क २०२० मधील ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेची ‘फर्स्ट रनर अप’ बनण्याचा बहुमान मिळवला आहे. जालना शहरातील दामिनी पथकाच्या प्रमुख पीएसआय पल्लवी जाधव यांनी ही लय भारी कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशाचे केवळ पोलिस दल नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातून कौतुक होत आहे. (Farmer’s PSI daughter becomes ‘first runner up’ of ‘Glamon Miss India’)
देशभरातून ७० हून अधिक महिला स्पर्धकांचा सहभाग
पल्लवी जाधव यांनी ‘ग्लॅमऑन मिस इंडिया’ स्पर्धेची ‘फर्स्ट रनर अप’ बनण्यासह ‘मिस फोटोजेनिक’ हा किताबही पटकावला आहे. जयपूरमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातून ७० हून अधिक महिला स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पल्लवी मागील पाच वर्षांपासून जालना पोलिस दलात उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. २०२० ची स्पर्धा कोरोना महामारीमुळे स्थगित ठेवण्यात आली होती. अखेर ती स्पर्धा यंदा म्हणजेच फेब्रुवारीमध्ये घेण्यात आली. स्पर्धेत मिळालेल्या यशाबद्दल पल्लवी यांनी खूप आनंद व्यक्त केला आहे. मी घेतलेल्या विशेष मेहनतीचे मला फळ मिळाले आहे. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळेच मी इथपर्यंतचा प्रवास करू शकली आहे, अशी कृतज्ञताही पल्लवी यांनी व्यक्त केली आहे.
पल्लवी यांचा जीवन संघर्ष
पल्लवी जाधव या मुळच्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रेल गावाच्या रहिवासी आहेत. लहानपणापासूनच पल्लवी यांनी खूप कष्ट घेतले. ‘कमवा आणि शिका’ या योजनेअंतर्गत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. अनेकदा त्या दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करायला जायच्या. शिक्षण पूर्ण करणं हे त्यांच्यासाठी सोपं नव्हतं. त्यांच्यासमोर अनेक आर्थिक अडचणी आल्या. शिक्षण पूर्ण करणं हे तितकं सोपं नव्हतं. मात्र जिद्दीने त्यांनी ते पूर्ण केलं. पल्लवी यांनी सायकोलॉजीमध्ये एमए पूर्ण केलं आहे. त्यानंतर पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत तीन वर्षे खूप स्ट्रगल केलं. अनेकदा उपाशी राहून अभ्यास केला. पल्लवी यांना पुढे डीवायएसपी व्हायची इच्छा आहे.
मॉडेल बनणे हे लहापणापासूनचे स्वप्न
आपणही मॉडेल बनावे असे पल्लवी यांना लहानपणापासून वाटायचे. मात्र मोठी झाल्यानंतर हे स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असं आपल्या लक्षात आल्याचं त्या सांगतात. त्यानंतर 2019 मध्ये ग्लॅमॉन मिस इंडियाची सौंदर्यस्पर्धेची जाहिरात पल्लवी यांनी सोशल मीडियावर पाहिली. ही जाहिरात पाहिल्यानंतर पल्लवी यांचे मॉडेल बनण्याचे स्वप्न पुन्हा डोळ्याभोवती फेर धरु लागले. त्यांनी या स्पर्धेत भाग घेतला, मात्र कोरोनामुळे गेल्या ही स्पर्धा स्थगित झाली. यावर्षी ही स्पर्धा जयपूरमध्ये झाली. त्यात पल्लवी यांनी सहभाग घेतला आणि यात त्यांची फर्स्ट रनरअप म्हणून निवड झाली. सध्या त्या एका सिनेमातही काम करीत आहेत. मी आयुष्यभर पोलिसच राहीन आणि पोलीस अधिकारी म्हणूनच निवृत्त होईन, असे पल्लवी यांनी आवर्जून सांगितले. (Farmer’s PSI daughter becomes ‘first runner up’ of ‘Glamon Miss India’)
Unconditional love of Jalna public.. Thank you so much to all. Keep showring yours love… Glammon miss India 2020. pic.twitter.com/jAWPuLMePy
— Pallavi Jadhav PSI (@PSIPallavi) March 4, 2021
इतर बातम्या
मोठी बातमी! SBI, Infosys सह ‘या’ कंपन्या कर्मचार्यांच्या कोविड लसीकरणाचा खर्च उचलणार
विकासकांना मालमत्ता अधिमूल्यात 50 टक्के सूट, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय
