LIVE | औरंगाबादेत दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

| Updated on: Mar 12, 2021 | 7:40 PM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | औरंगाबादेत दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
संजय राठोड

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Mar 2021 10:01 PM (IST)

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिीचा विचार करता जिल्हयातील ग्रामीण भागातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) इयता.10 वी व इयत्ता.12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत. पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने सुरु ठेवण्यात येत आहे. इ.10 वी व इ.12 वी चे वर्ग नियमित सुरु ठेऊन सदरील विद्यार्थ्याची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करुन त्याची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्यात यावी.

  • 04 Mar 2021 08:40 PM (IST)

    60 हजारांची लाच घेताना मुंबई वाहतूक विभागातील वरिष्ठ लिपीकला अटक

    मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाच्या 100 मीटर अंतरावरच एसीबीचा ट्रॅप…

    60 हजारांची लाच घेताना मुंबई वाहतूक विभागातील वरिष्ठ लिपीकला अटक…

    आजारी असल्याने फिर्यादी असणारे वाहतूक अंमलदार हे जवळपास दीड वर्ष सुट्टीवर होते त्यांचा 10 महिन्याचा पगार थकवण्यात आला होता तो पारित करण्यासाठी मागितली होती 1 लाख रुपयांची लाच…

    तडजोडीअंती 60 हजार लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपीकला अटक…

    सचिन आत्माराम नडे असे आरोपीचे नाव असून तो वाहतुक मुख्यालयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यारत होता..

  • 04 Mar 2021 06:40 PM (IST)

    मुनगंटीवारांची राष्ट्रपती राजवटीची भाषा म्हणजे नरेंद्र मोदींची राजकीय भूमिका : पटोले

    राष्ट्रपती राजवट लावण्यासंदर्भात सुधीर मुनगंटीवार जी वक्तव्य करत आहेत ती पाहिली असता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राजकीय भूमिका ते मांडत आहेत. भाजपवाल्यांना राज्यपालांच्या मार्फत राज्यात राष्ट्रपती राजवट लावून राज्यातील सरकार अस्थिर करायचं, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

    बाबरी मज्जिद राम मंदिर हे प्रश्न घेऊनच आता भाजपला पुन्हा एकदा लोकांमध्ये भावना भडकवण्याचे काम करायच आहे. त्यामुळे जनतेला आता हे सगळं कळलेले आहे. यातून काहीही साध्य होणार नाही, असं पटोले म्हणाले.

  • 04 Mar 2021 04:31 PM (IST)

    संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

    पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता.

  • 04 Mar 2021 02:19 PM (IST)

    गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरण, तक्रारदार कृष्णा पाटील डोनगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा ठिय्या

    औरंगाबाद : गंगापूर साखर कारखाना घोटाळा प्रकरण, तक्रारदार कृष्णा पाटील डोनगावकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पुन्हा ठिय्या, गंगापूर तालुक्यातील संचालक सभासदांनी पुन्हा दिला ठिय्या, तक्रारदार भारत तुपलोंढे हाताला सलाईन लावून पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, प्रकृती बिघडल्यांनातरही गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कृष्णा पाटील डोनगावकर यांच्यावर खंडणीचा गुन्ह दाखल करण्यासाठी ठिय्या

  • 04 Mar 2021 12:24 PM (IST)

    बुलडाण्यात 446 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह

    बुलडाणा - आज प्राप्त झालेल्या 2,739 कोरोना अहवालांमध्ये 446 रुग्णांचे अहवाल पॉझिटीव्ह, कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा एकूण आकडा 19,980 झाला, सद्यस्थितीत जवळपास 2,492 रुग्णांवर उपचार सुरु, तसेच आजवरचा कोरोना बाधितांच्या मृत्यूचा आकडा 195 वर जाऊन पोहोचला

  • 04 Mar 2021 11:17 AM (IST)

    पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं

    पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, पुणेकरांवरील पाणीकपातीचं संकट टळलं, यंदा धरणक्षेत्रात झालेल्या जोरदार पावसानं पाणीसाठ्यात चांगली वाढ, खडकवासला धरणक्षेत्रात गतवर्षीपेक्षा 2 टीएमसी पाणी जास्त, तर वरसगाव, पानशेत, आणि टेमघर या धरणांत 29 टीएमसी पाणीसाठा, त्यामुळे यंदा पाणीकपात केली जाणार नाही, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांची माहिती

  • 04 Mar 2021 09:19 AM (IST)

    नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना आक्रमक,  पूर्व नागपुरातील यमस्यांसाठी शिवसेनेचा मनपाच्या लकडगंज झोनला घेराव

    नागपूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेना आक्रमक,  पूर्व नागपुरातील यमस्यांसाठी शिवसेनेचा मनपाच्या लकडगंज झोनला घेराव, उपजिल्हाप्रमुख गुड्डू रहांगडालेंच्या नेतृत्त्वात शिवसेनेचं आंदोलन, नागपुरात सत्ताधारी भाजप विरोधात शिवसेना आक्रमक, स्वच्छता, अतिक्रमण कारवाईचा विरोध, पथदिव्यांच्या समस्यांबाबत दिलं निवेदन

  • 04 Mar 2021 08:30 AM (IST)

    नाशकात पाईपलाईनच्या खोडकामात महापालिकेला कोट्यवधींचा चुना, शहर अभियंता संजय घुगे यांच्या चौकशीचे आदेश

    नाशिक - पाईपलाईनच्या खोडकामात महापालिकेला कोट्यवधींचा चुना, शहर अभियंता संजय घुगे यांच्या चौकशीचे आदेश, पाईपलाईन द्वारे घरगुती गॅस देण्यासाठी रस्ते खोदण्याची परवानगी देताना लावले जुने डीसीआरचे दर, 45 फाईल्समध्ये नवीन डीसीआर प्रमाणे रक्कम भरून घेण्याचे आदेश

  • 04 Mar 2021 08:28 AM (IST)

    दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग, नाशकात रिक्षाचालकाचा तरुणावर प्राणघातक हल्ला

    नाशिक - दारु पिण्यास पैसे न दिल्याचा राग, रिक्षाचालकाचा तरुणावर प्राणघातक हल्ला, दारुसाठी पैसे का देत नाही म्हणत धारदार हत्याराने केला हल्ला, मारहाणीत दत्ता गोसावी।हा तरुण गंभीर जखमी, पोलिसांनी संशयित रिक्षाचालकास केली अटक

  • 04 Mar 2021 08:03 AM (IST)

    नाशकात दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्र गहाळ प्रकरण, कागदपत्र नेणारा लिपिक निलंबित

    नाशिक - दुय्यम निबंधक कार्यालयातील कागदपत्र गहाळ प्रकरण, कागदपत्र नेणारा लिपिक निलंबित, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांची थेट कारवाई, प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश, कागदपत्रे गहाळ होण्यामागे मोठं कारस्थान असल्याचा संशय

  • 04 Mar 2021 08:00 AM (IST)

    छत्तीसगडमधील कोषागार विभागात कार्यरत सहसंचालकाचा नागपुरातील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला

    नागपूर - छत्तीसगडमधील कोषागार विभागात कार्यरत सहसंचालक राजेश श्रीवास्तव यांचा नागपूर येथील लॉजमध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला, आत्महत्या केली असल्याचा संशय, या घटनेने नागपुरात प्रचंड खळबळ उडाली, याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे

  • 04 Mar 2021 07:30 AM (IST)

    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नव्याने एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली जाणार

    पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी नव्याने एजन्सी नियुक्त करण्यासाठी प्रक्रिया सुरु केली जाणार, पुढील 10 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल होण्याची शक्यता, त्यामुळे नव्या एजन्सीला तयारीला वेळ देणे, सराव परीक्षा घेणे ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लागणार वेळ, त्यामुळे विद्यापीठाची परीक्षा किमान 15 दिवस लांबणीवर पडणार, आता मार्च ऐवजी एप्रिलमध्ये परीक्षा होणार असल्याचे झालं स्पष्ट

  • 04 Mar 2021 07:28 AM (IST)

    नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परिक्षा 8 मार्चपासून सुरु होणार

    नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परिक्षा 8 मार्चपासून सुरु होणार, विद्यापीठाच्या परिक्षा मंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय, सुरुवातीला होणार प्रात्यक्षिक परिक्षा, 20 मार्चपासून ॲानलाईन परिक्षा सुरु होणार, संपूर्ण परिक्षा ॲानलाई असून चार टप्प्यात होणार

  • 04 Mar 2021 07:27 AM (IST)

    पुण्यात होम आयसोलेशनमधील कोरोना बाधितांच्या शोधासाठी महापालिका घेणार पोलिसांची मदत

    पुणे : होम आयसोलेशनमधील कोरोना बाधितांच्या शोधासाठी महापालिका घेणार पोलिसांची मदत, कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना अनेक संशयित खासगी प्रयोगशाळांमध्ये जाऊन कोरोना तपासणी, परंतु ही तपासणी करताना आपले संपर्क क्रमांक व पत्ते चुकीचे देत असल्याचे आलं आढळून, त्यामुळे अशा कोरोनाबाधितांना शोधण्यासाठी आता महापालिकेने ठोठावल थेट पोलिसांचे दार, खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीचा शोध यापुढे पोलिसांकडून घेतला जाणार, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत साधला पोलीस यंत्रणेशी संपर्क, खोटी माहिती देणाऱ्या 20 कोरोनाबाधितांची यादी केली पोलिसांकडे सुपूर्द

  • 04 Mar 2021 07:18 AM (IST)

    ‘टीव्ही 9 मराठी’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल, गर्दी टाळण्यासाठी नागपुरात कोरोना लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ

    ‘टीव्ही ९ मराठी’च्या वृत्ताची प्रशासनाकडून दखल, गर्दी टाळण्यासाठी नागपुरात कोरोना लसीकरण केंद्रांच्या संख्येत वाढ, नागपुरात १७ खाजगी रुग्णालयात होणार लसीकरण,  लसीकरण केंद्रांवर ज्येष्ठांना पिण्याचं पाणी, बसण्याची सोय करणार, लसीकरण केंद्रात गर्दी, गैरसोय, ही बातमी टीव्ही ९ ने लावून धरली होती,  शेवटी प्रशासनाला आली जाग, लसीकरण केंद्र वाढविण्याचा निर्णय

  • 04 Mar 2021 07:10 AM (IST)

    तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत प्लास्टीक आणि थर्माकोलला पूर्णपणे बंदीचा निर्णय

    तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत प्लास्टीक आणि थर्माकोलला पूर्णपणे बंदीचा निर्णय, असून शहरात बंदी असताना जर कोणी अशा वस्तू वापर करताना आढल्यास 5 हजार रुपये दंड भरावा लागणार, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या वतीने प्लास्टीक आणि थर्माकॉलबंदी विषयी नियोजन करण्यासाठी शहरातील सर्व हॉटेल व्यावसायिक, किराणा दुकानदार, व्यापारी, इतर व्यावसायिक दुकानदार, सामाजिक संस्था, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आदींबरोबर विचार विनिमयासाठी नगरपरिषदेच्या हॉलमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी झाला निर्णय

  • 04 Mar 2021 06:46 AM (IST)

    मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूरजवळ अपघात, एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी

    रायगड - मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर खालापूरजवळ अपघात, अपघातात एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी, मध्यरात्री साडेबारा वाजताची घटना, पुणे कडे जाणाऱ्या लेनवर पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकला दुसऱ्या ट्रकने मागून धडक दिल्याने झाला अपघात, पुढच्या ट्रकचा चालक ठार तर मागील ट्रक मधील दोघे जखमी, जखमीना बाहेर काढून रुग्णालयात दाखल

  • 04 Mar 2021 06:22 AM (IST)

    कसारा आणि खर्डी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला जंगलाला आग

    शहापूर - कसारा आणि खर्डी रेल्वे स्थानकाच्या दोन्ही बाजूला जंगलाला आग लागली आहे, रेल्वेच्या दोन्ही बाजूला आग लागल्यामुळे खर्डी आणि करणाऱ्या कडे दोन्ही बाजूला जाणारी रेल्वे वाहतूक काही वेळासाठी थांबवण्यात आली होती, साधारण 100 हुन रेल्वे कर्मचारी आग विझवण्यासाठी उपस्थित होते, त्यानंतर आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात यश

Published On - Mar 04,2021 10:01 PM

Follow us
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.