AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला

Crime News : जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील एका व्यक्तीने आपल्या 4 मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपनल्याची घटना घडली आहे, त्यामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.

आधी बायकोला माहेरी सोडलं अन् चार मुलांना विहिरीत ढकलून स्वत:लाही संपवलं; महाराष्ट्र हादरला
Jalgaon Crime Image Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 25, 2026 | 4:51 PM
Share

जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा धरण परिसरात असलेल्या एका शेतातील विहिरीत पाच मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील विजय मुसा किराडिया याने आपली मुले प्रित किराडिया, प्राची किराडिया, पूर्वी किराडिया आणि पियुष किराडिया या चार मुलांसह राजुरा धरण परिसरातील विहिरीत आधी ढकलून नंतर स्वतः आत्महत्या केली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पत्नीसोबत वाद झाल्याने उचलले टोकाचे पाऊल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काल विजय यांचे आपल्या पत्नीसोबत कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे विजय यांची पत्नी मुलांना सोडून माहेरी निघून गेली होती. त्यामुळे विजय चिंतेत होते. आज सकाळी विजय यांना आपल्या मुलांना चहा करून पाजला. त्यानंतर ते घरातील घरकाम करत असताना त्यांच्या वडिलांनी, तू स्वतः काम का करतो तुझी बायको कुठे गेली? असं विचारलं.

आधी मुलांना विहिरीत ढकलले आणि नंतर आत्महत्या

वडिलांनी विचारल्यामुळे विजय यांना आणखी मानसिक त्रास झाला आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्या चारही मुलांना घेत जवळची विहीर गाठली. त्यानंतर त्यांनी आपल्या चारही मुलांना विहिरीत ढकलून दिले आणि स्वतःही आत्महत्या केली आहे. मुलांना विहिरीत टाकल्यानंतर त्यांनी स्वतः विहिरीच्या कडेला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला; परंतु वजनामुळे दोरी तुटली आणि हेही विहिरीत पडले. त्यामुळे पाचही जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

पोलिसांकडून तपासाला सुरुवात

या घटनेच्या काही वेळानंतर शेताचे मालक तिथे आले असता, त्यांना विहिरीच्या काठावर मोबाईल, चपला आणि कापलेली दोरी आढळून आली. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, त्यांना मृतदेह दिसले. त्यांनी तातडीने या घटनेची माहिती जळगाव जामोद पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाचही मृतदेह विहिरीबाहेर काढले. हे सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ