AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थर्टी फर्स्ट अंगात येऊ देऊ नका, हॉटेल,पब, क्लबमध्ये जाताना जपून, 31 डिसेंबरपर्यंत…

डिसेंबर महीना उजाडताच अनेकांना 31 च्या पार्टी, अर्थात नववर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. बाहेर फिरायला जाऊन, तर काहींचे हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशनचे प्लान बनतात.

थर्टी फर्स्ट अंगात येऊ देऊ नका, हॉटेल,पब, क्लबमध्ये जाताना जपून, 31 डिसेंबरपर्यंत…
| Updated on: Dec 07, 2024 | 10:35 AM
Share

डिसेंबर महीना उजाडताच अनेकांना 31 च्या पार्टी, अर्थात नववर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. बाहेर फिरायला जाऊन, तर काहींचे हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशनचे प्लान बनतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी 31 तारखेला नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्येही किंवा क्लबमध्येही पार्टीजचे आयोजन करण्यात येतं. मात्र याच पार्श्वभूमीवर एफडीएने मोठं पाऊल उचललं आहे.

या पार्टीदरम्यान संधी साधून निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, तसेच अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबवर करडी नजर ठेवणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 5 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अन्नपदार्थांची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या मोफत क्रमांक 1800222365 वर करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे 31च्या पार्टीसाठी हॉटेल किंवा पबमध्ये जाताना जपून जा असा सल्लाही ग्राहकांना देण्यात आला आहे.

CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.