शिर्डी साईबाबा संस्थानकडून रिपोर्टरविरोधात गुन्हा दाखल, प्रसारमाध्यमांवर सूड उगवल्याचा गंभीर आरोप

मागील अनेक दिवसांपासून काही ना काही कारणाने वादाच्या केंद्रस्थानी असलेलं शिर्डी पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आहे.

शिर्डी साईबाबा संस्थानकडून रिपोर्टरविरोधात गुन्हा दाखल, प्रसारमाध्यमांवर सूड उगवल्याचा गंभीर आरोप

शिर्डी : मागील अनेक दिवसांपासून काही ना काही कारणाने वादाच्या केंद्रस्थानी असलेलं शिर्डी पुन्हा एकदा एका नव्या वादामुळे चर्चेत आहे. आता शिर्डी साईबाबा संस्थानने प्रसारमाध्यमांवर सूड भावनेने गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप होतोय. मंदिर परिसरात भाविकांचे बाईट घेतले आणि गर्दी जमा केली असा आरोप करत संस्थान अधिकाऱ्यांनी एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरवरच गुन्हा दाखल केलाय. त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झालाय (FIR against journalist for reporting during Corona in Shirdi by Sai Baba Trust administration).

शिर्डीतील साई मंदिर 16 नोव्हेंबर 2020 रोजी खुलं झालं. त्यावेळी संबंधित पत्रकाराने साई मंदिरात हजर भाविकांशी चर्चा करत त्यांचे अनुभव जाणून घेतले. हे इतकं वृत्तांकन केलं म्हणून हा गुन्हा दाखल झालाय. विशेष म्हणजे हा गुन्हा तब्बल अडीच महिन्यानंतर दाखल करण्यात आलाय. त्यामुळे शिर्डी साई संस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. एकिकडे मोठ्या प्रमाणात भाविकांनी मंदिरात केली असताना तेथे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. मात्र, संस्थानच्या अव्यवस्थेबद्दल वार्तांकन करणाऱ्यांवर केवळ वार्ताकन केल्यामुळे गुन्हा दाखल करत आहे.

साई संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या तक्रारीवर नितीन ओझा, मुकूल कुलकर्णी आणि कँमेरामन अशा तिघांवर गुन्हा दाखल झालाय. भादंवी कलम 353, 188, 34 अन्वये गुन्हा दाखल आहे. मात्र, संबंधित पत्रकारांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांच्या मनमानी कारभाराविरोधात बातम्या दिल्याच्या सुड भावनेतून हा गुन्हा दाखल झाल्याचा आरोप केला.

हेही वाचा :

अनलॉकनंतर 71 दिवसांत साई चरणी 32 कोटीचं दान, तर तुळजाभवानी मंदिरात दर्शन पासची संख्या वाढवली 

साई मंदिराची सर्व दारं उघडा नाहीतर आंदोलन, शिर्डी ग्रामस्थांचा इशारा

शिर्डीतील साई मंदिरात पत्रकारांसाठी जाचक अटी, संस्थान अधिकारी नेमकं काय लपवतायत?

व्हिडीओ पाहा : 

FIR against journalist for reporting during Corona in Shirdi by Sai Baba Trust administration

Published On - 12:56 am, Mon, 1 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI