नाशिक- मुंबई महामार्गावर वाहन अपघातात चौघा बहिणभावांचा मृत्यू,गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनाहून परतताना काळाचा घाला
नाशिक- मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर भीषण अपघात घडला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त रामदास बाबा यांच्या मठातून दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मुंबई अंधेरीतील चौघा बहिण-भावंडांचा मृत्यू झाला आहे.

सिमेंटच्या कंटेनरने धडक दिल्याने इको कारमधील चौघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नाशिक मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावरजवळ घडली. या अपघातात दोन महिला आणि दोन पुरुषांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त रामदास बाबा यांच्या मठातून दर्शन घेऊन परतताना हा भीषण अपघात झाला आहे.
एका इको कारला सिमेंट कंटेनर चालकाने जोरदार धडक देत फरफटत नेल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाल्याची घटना नाशिक-मुंबई महामार्गावर मुंढेगाव फाट्यावर गुरुवारी दुपारी घडली आहे. या अपघातामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
हा अपघात इतका भीषण झाला की इको कारमधील चौघा बहिण भावंडांचा जागीच मृत्यू झाला. यातील दोन पुरुष आणि दोन महिला असून ते एकाच कुटुंबातील असून बहिण-भाऊ आहेत. या कारचा अपघातात घडल्यानंतर घटना स्थळी घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याची टीम दाखल झाली. मृतांना कारचे पत्रे कापुन काढण्यात आले आहे.
अंधेरी चार बंगला येथील रहिवासी
अपघातातील मृतांची ओळख पटली असून हे सर्व अंधेरीतील रहिवासी आहेत. गुरू पौर्णिमेनिमित्त हे सर्व जण रामदास बाबांच्या मठात दर्शनासाठी गेले होते. परतताना वाटेत हा भीषण अपघात घडला. मृतांची नावे खालीलप्रमाणे आहेत. चारही मृतांची ओळख पटली असून हे सर्व जण एकाच कुटुंबातील असून सख्खे भाऊ बहीण आहेत. मृतात दत्ता आंब्रे, नित्यानंद सावंत, विद्या सावंत, मीना सावंत यांचा समावेश असून हे सर्व चार बंगला, अंधेरी मुंबई येथील रहिवासी आहेत.
घोटी पोलिस, महामार्ग पोलिस, टोल नाक्याची टीम घटना स्थळी दाखल झाली. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने गाडीखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यास सुरुवात झाली. या अपघाताने महामार्गावर काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हे सर्व रहिवासी अंधेरी येथील असून ते सर्वजण गुरुपौर्णिमेनिमित्त रामदास बाबा यांच्या मठात दर्शनासाठी आले होते
