naxal and police encounter: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव, पोलिसांकडून लाखोंचे बक्षीस असलेल्या चार नक्षलींचा खात्मा

naxal and police encounter: लोकसभा निवडणुकी दरम्यान मोठा घातपात घडवण्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात एक मोठा नक्षलवादी गट लपल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष सी-60 कमांडोंनी जंगल परिसरात कारवाई सुरू केली.

naxal and police encounter: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव, पोलिसांकडून लाखोंचे बक्षीस असलेल्या चार नक्षलींचा खात्मा
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 10:00 AM

गडचिरोली | 19 मार्च 2024 : महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मंगळवारी पहाटे चकमक सुरु झाली. या चकमकीत पोलिसांनी चार नक्षलींचा खात्मा केला आहे. पोलिसांचे C 60 कमांडो आणि नक्षलवाद्यांमध्ये पहाटेच्या सुमारास दीड ते दोन तास चकमक झाली. या चकमकीनंतर पोलिसांना घटनास्थळी 4 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा मोठा डाव या नक्षलींनी आखला होता. पोलिसांनी हा डाव उधळून लावला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांवर 36 लाखांचे बक्षीस होते.

नक्षल्यांकडून शस्त्रे जप्त

लोकसभा निवडणुकी दरम्यान मोठा घातपात घडवण्यासाठी गडचिरोलीच्या जंगलात एक मोठा नक्षलवादी गट लपल्याची गुप्त माहिती महाराष्ट्र पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर महाराष्ट्र पोलीस आणि सीआरपीएफच्या विशेष सी-60 कमांडोंनी जंगल परिसरात कारवाई सुरू केली. कमांडो जंगलात पोहचताच नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरु केला. कमांडोकडून त्यांना प्रत्युत्तर देण्यात आले. सुमारे दोन तास ही चकमक सुरू होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून ४ नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांकडून एके ४७ रायफलसह अनेक शस्त्रेही जप्त केली आहेत. पोलिसांना त्यांच्याकडून नक्षलवादी साहित्यही मिळाले आहे.

शोधमोहीम सुरु

अतिरिक्त पोलीस अधीक्षक (ऑपरेशन) यातिष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नक्षलींच्या शोधसाठी मोहिम राबवण्यात येत आहे. पोलीस मदत केंद्र रेपनपल्लीच्या 5 किमी अंतरावर कोलामार्का जंगलामध्ये नक्षलींचा शोध सुरु आहे. हे सर्व नक्षलवादी तेलंगणा सीमा ओलांडून गडचिरोलीत प्रवेश करत होते. यावेळी झालेल्या चकमकीत डीव्हीसी सदस्य वर्गीश, डीव्हीसी मंगतू, प्लाटून सदस्य कुरसम राजू आणि प्लाटून सदस्य व्यकंटेश यांचा खात्मा झाला.

हे सुद्धा वाचा

जानेवारीत पकडले होते पाच नक्षली

नक्षलवादी सभेसाठी तेलंगाना राज्य ओलांडून महाराष्ट्रात प्रवेश करताना ही घटना घडली. यापूर्वी जानेवारी महिन्यातच नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई झाली होती. त्यावेळी पाच नक्षली पकडले गेले होते. त्यावेळी झालेल्या चकमकीत नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. परंतु सी ६० कामांडोनी त्यांना पकडले होते.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.