गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा लता मंगेशकर पुरस्काराने गौरव, चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘या’ कलाकारांचाही सन्मान
मुंबईतील वरळी डोममध्ये हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा लता मंगेशकर पुरस्काराने गौरव करण्यात आला.

मुंबईतील वरळी डोममध्ये हीरक महोत्सवी राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा लता मंगेशकर पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उपस्थित होते. या कार्यक्रमात इतरही अनेक कलाकारांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
आज झालेल्या कार्यक्रमात 60 आणि 61 वे राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांनी देण्यात आला. तसेच महेश मांजरेकर यांचा चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार (2024) देऊन गौरव करण्यात आली.
या कलाकारांचा सन्मान
- गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – भीमराव पांचाळे
- चित्रपती कै. व्ही. शांताराम जीवन गौरव पुरस्कार (2024) – प्रसिध्द दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर
- चित्रपती कै. व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री मुक्ता बर्वे
- स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार (2024) – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर
- स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री काजोल
गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘भीमराव पांचाळे यांच्या गझलांनी गेली 50 वर्ष सर्वांवर मोहिनी घातली आहे. अमरावती जिल्ह्याने आपल्याला दोन हिरे दिले आहेत. एक भीमराव पांचाळे आणि दुसरे म्हणजे सुरेश भट. या जोडीने गझलांना वेगळी उंची दिली. मराठीतील गझलांमध्ये भीमराव पांचाळे आणि सुरेश भट यांचा कोई मुकाबला नही. कित्येक देशांमध्ये त्यांनी गझला नेल्या. वर्ध्याच्या स्मशानातही त्यांनी कार्यक्रम केला असं फडणवीसांनी म्हटलं.
पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अनुमप खेर यांना आपण पुरस्कार दिला. त्याच्याबद्दल काही सांगण्याची गरज नाही. अतिशय सुंदरपणे ते भूमिका साकारत असतात. हास्यकलाकाराची भूमिका असेल किंवा संवेदनशील भूमिका असेल त्यांनी सर्व प्रकारच्या भूमिका सुंदरपणे साकारल्या आहेत.’ काजोलबद्दल बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘काजोल यांनी 30 वर्षांपूर्वी हिंदी चित्रपटामध्ये कारकीर्द सुरु केली. त्यानंतर सातत्याने त्यांच्या भूमिकेने प्रेक्षकांना भूरळ पाडली. आजही समर्थपणे त्या सिनेमामध्ये भूमिका पार पाडत आहेत.’
