AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Girish Mahajan : मुंबई महापालिकेतील नगरेसवकांबद्दल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव यांना वेळीच केलं अलर्ट

Girish Mahajan : "राऊतांमुळे जास्त नुकसान झालं. प्रत्येक ऑपरेशनच्यावेळी म्हटलं यांना आवरा. उद्धवजी आम्हाला सोडून गेले. औटघटकेचे राजा बनले. हा मानवी बॉम्ब आहे. गळ्यात बांधून घेतलाय" अशा शब्दात संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला.

Girish Mahajan : मुंबई महापालिकेतील नगरेसवकांबद्दल भाजप नेते गिरीश महाजन यांनी उद्धव यांना वेळीच केलं अलर्ट
Girish Mahajan
| Updated on: Jun 18, 2026 | 2:12 PM
Share

आज विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नाशिकच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण तिथे महायुतीत धुसफूस पहायला मिळालेली. गोकुळ गीते यांच्या माघारीसाठी दोन-दोन मंत्र्यांना मनधरणी करावी लागली. नाशिकमध्ये काही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपंकडून विशेष काळजी घेतली जात आहे. गिरीश महाजन आज स्वत: नाशिकमध्ये आले. नगरसेवकांशी संवाद साधला. त्यानंतर ते मीडियाशी बोलले. “गोकुळ गीते यांनी सांगितलं, मला मतदान करु नका. मी उमेदवार नाही. नरेंद्र दराडेंना मतदान करा. हे त्यांनी सांगितलं, इथे कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही” असं गिरीश महाजन म्हणाले.

त्यावर पत्रकारांनी त्यांना, तुमच्यासारख्या मंत्र्याला नगरसेवकांना मतदानाला आणावं लागत असा प्रश्न केला. त्यावर गिरीश महाजन म्हणाले की, “निवडणूक कुठलीही असली तरी आम्ही गांभीर्याने घेतो. कुठल्याही निवडणुकीत थोडीशी ढील देत नाही” “निवडणूक छोटी असो वा मोठी शेवटी कार्यकर्त्यांसाठी आम्हाला यावं लागेल. कार्यकर्ते आमच्यासाठी मेहनत घेतात, त्यांना वाऱ्यावर सोडायचं? आमच्याकडे ही पद्धत नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे, त्यांची काय अवस्था झाली आपण पाहताय” असं गिरीश महाजन म्हणाले.

राडा करायला पण कोणी शिल्लक राहिलेलं नाही

“जास्त मतदान आम्हाला होणार. निवडणूक आहे, काळजी घ्यावी लागते. आमच्यासाठी आमचे कार्यकर्ते जागरण करतात, मेहनत घेतात. एकदिवस आम्ही त्यांना जाऊन भेटलो तर काय झालं?” असं गिरीश महाजन म्हणाले. उद्धव ठाकरे गटातील खासदार फुटीनंतर संजय राऊत यांनी राडा करण्याचं आव्हान केलं आहे. त्यावर “राडा करायला पण कोणी शिल्लक राहिलेलं नाही. ते दिवस गेले, जेव्हा तुम्ही आमच्यासोबत होता. ते आता राहिलचं नाही. काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. राहुल गांधींना पंतप्रधान बनवा म्हणून मागे-मागे फिरता” अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.

लोकच तिथे रहायला तयार नाहीत

“ग्राऊंडवर आहात कुठे, तुमचे लोक सुद्धा तुमच्यावर वैतागलेत, आमदार वैतागलेत. मुंबई महापालिकेतील नगरेसवक सुद्धा जय महाराष्ट्र करतील” असं गिरीश महाजन म्हणाले. “लोकांना वाऱ्यावर सोडलय. लोकच तिथे रहायला तयार नाहीत. त्यांना सांगतात ज्यांना रहायचय त्यांनी रहा, ज्यांना जायचय त्यांनी जा. पक्ष चालवण्याची ही कुठली पद्धत झाली. लोकांना थांबयचय कुठे तुमची बडबड ऐकण्यासाठी” अशा शब्दात गिरीश महाजन यांनी टीका केली.

Follow Us
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील
Omraje Nimbalkar | खासदार ओमराजेंबबात मोठी अपडेट समोर; थेट पुण्यातील निवसस्थानी... राजकारणातील हालचालींना वेग
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी..
अखेर प्रीति झिंटाला डिपफेक प्रकरणी मोठा दिलासा, कोर्टाने थेट परवानगी दिली; आता अभिनेत्री...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्...
मोठी बातमी! सही न करणारे खासादार ठाकरेंसोबत? बैठकीतून फोन लावला अन्... 'ऑपरेशन टायगर'बाबत मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...
बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली म्हणूनच...; खासदार फुटीनंतर दादा भुसेंचं मोठं विधान